शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

थेट अदानींशी सामना; मुकेश अंबानींनी 'या' कंपनीत केली 100 कोटींची गुंतवणूक...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 3:10 PM

1 / 9
ग्रीन एनर्जी सेक्टर (Green Energy Sector)मध्ये देशातील दोन सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची टक्कर होणार आहे. जगातील तिसरे आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अडानी (Gautam Adani) आणि रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance Industries) चे चेअरमन तथा भारताचे दुसरे सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani), या दोघांनी सध्या ग्रीन एनर्जी सेक्टरवर लक्ष केंद्रित केले आहे.
2 / 9
यातच अंबानींच्या रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडची मालकी असलेल्या रिलायंस न्यू एनर्जी लिमिटेड (Reliance New Energy Limited) ने अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या कॅलक्स कॉरपोरेशन (Caelux Corporation) मध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
3 / 9
रिलायंस इंडस्ट्रीजने एका निवेदनात सांगितले की, त्यांची मालकी असलेली रिलायंस न्यू एनर्जी लिमिटेड (RINL), नेक्स्ट जनरेशन सोलार टेक्नॉलॉजीच्या (Solar Technology) विकासासाठी अमेरिकेतील कॅलक्समध्ये 20 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यासाठी रिलायंस न्यू एनर्जीने 1.2 कोटी डॉलर म्हणजेच सूमारे 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
4 / 9
या गुंतवणुकीतून ‘अॅडव्हान्स सोलर सेल टेक्नोलॉजी’ विकसित करण्याची रिलायन्सची योजना आहे. यामुळे येणाऱ्या काळात ग्रीन एनर्जी सेगमेंटमध्ये रिलायन्स मोठ्या उद्योगाच्या रुपाने नावारुपाला येईल. मुकेश अंबानींच्या गुंतवणुकीमुळे कॅलक्सला तंत्रज्ञानात विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासह अमेरिके आणि जगभरातील बाजारपेठांमध्ये पाय रोवण्यास मदत होईल.
5 / 9
यासाठी दोन्ही कंपन्यांनी धोरणात्मक भागीदारी करार केला आहे. खरं तर, कॅलक्स त्याच्या पेरोव्स्काईट-आधारित सौर तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. कंपनी उच्च-कार्यक्षमतेचे सौर मॉड्यूल तयार करते, जे 20 टक्के अधिक ऊर्जा निर्माण करू शकते. कंपनीचे सौर प्रकल्प 25 वर्षे वीज निर्माण करण्यास सक्षम, असे तंत्रज्ञान बनवतात आणि त्याची किंमतही खूप कमी आहे.
6 / 9
रिलायन्स गुजरातमधील जामनगर येथे जागतिक दर्जाचा इंटिग्रेटेड फोटोव्होल्टेइक गिगा कारखाना उभारत आहे. या गुंतवणुकीमुळे, रिलायन्स कॅकक्सच्या उत्पादनांचा फायदा घेण्यास, तसेच अधिक शक्तिशाली आणि कमी किमतीच्या सौर मॉड्यूल्सची निर्मिती करण्यास सक्षम होईल. या करारासाठी कोणत्याही नियामकाच्या मंजुरीची आवश्यकता नाही. सप्टेंबर 2022 च्या अखेरीस हा करार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
7 / 9
गुंतवणुकीवर भाष्य करताना, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, 'कॅलक्समधील गुंतवणूक ही जागतिक दर्जाची ग्रीन एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम तयार करण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगत आहे. आम्हाला विश्वास आहे की कॅलक्सचे पेरोव्स्काईट-आधारित सौर तंत्रज्ञान आणि सौर मॉड्यूल आम्हाला पुढील टप्प्यावर पोहोचण्यास मदत करतील. आम्ही कॅलक्स टीमसोबत त्यांच्या उत्पादनाच्या विकासाला आणि त्याच्या तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणाला गती देण्यासाठी काम करू.'
8 / 9
दुसरीकडे, कॅलक्स कॉर्पोरेशनचे सीईओ स्कॉट ग्रीबिल यांनी रिलायन्समध्ये एक प्रमुख गुंतवणूकदार म्हणून सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 'आम्ही क्रिस्टलीय सौर मॉड्यूल अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर बनविण्यावर लक्ष केंद्रित करू. यातून आमच्या उत्पादन क्षमतांचा विस्तार होईल,' असे ते म्हणाले.
9 / 9
दुसरीकडे, कॅलक्स कॉर्पोरेशनचे सीईओ स्कॉट ग्रीबिल यांनी रिलायन्समध्ये एक प्रमुख गुंतवणूकदार म्हणून सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. 'आम्ही क्रिस्टलीय सौर मॉड्यूल अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर बनविण्यावर लक्ष केंद्रित करू. यातून आमच्या उत्पादन क्षमतांचा विस्तार होईल,' असे ते म्हणाले.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सAdaniअदानी