शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमच्याकडे आहेत का जुने शिक्के अथवा नोटा? RBI नं दिली लोकांना महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 2:52 PM

1 / 10
भारतीय रिझर्व्ह बँकेने जुन्या नोटा आणि शिक्के खरेदी-विक्री करण्यावरून सुरू असलेल्या ऑफर्सच्या जाळ्यात फसू नये असा सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत अधिकृत विधान करत लोकांना सावधान केले आहे.
2 / 10
आरबीआय (RBI) च्या म्हणण्यानुसार, काही लोक फसवणूक करून चुकीच्या पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नावाचा आणि लोगो वापर करत आहेत. विविध ऑनलाईन, ऑफलाइन प्लॅटफोर्मवरून जुन्या बँक नोटा, शिक्के खरेदी विक्री केली जात आहे.
3 / 10
ही खरेदी-विक्री कताना झालेल्या व्यवहारातून लोकांकडून शुल्क, कमीशन आणि टॅक्सची मागणी केली जाते. RBI ने स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा कुठल्याही प्रकरणात आरबीआय हस्तक्षेप करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही.
4 / 10
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्य जनतेला सावधान राहण्याचं आवाहन केले आहे. बँकेमार्फत कुठल्याही जुन्या नोटा आणि शिक्का खरेदी-विक्रीवर शुल्क अथवा कमीशन आकारण्यासाठी कोणत्या संस्थेला अथवा व्यक्तीची नियुक्ती केली नाही.
5 / 10
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्वसामान्यांना सतर्क करत त्यांच्या निवेदनात म्हटलंय की अशाप्रकारे खोट्या आणि फसवणूक करणाऱ्या ऑफर्सपासून सावधान राहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाचा वापर करून तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने पैसे लुटले जात आहेत.
6 / 10
तुम्हाला जुने सिक्के गोळा करण्याची सवय असेल तर घरबसल्या तुम्ही लखपती होऊ शकता. जर तुमच्याकडे २५ पैसाचे शिक्के असतील तर तुम्ही ऑनलाईन ते विकून दीड लाख रुपये कमवू शकता अशी विविध ऑफर्स अलीकडच्या काळात दिल्या जात आहेत.
7 / 10
जुने सिक्के आणि नोटा इंडिया मार्ट डॉट कॉमवर (indiamart.com) बोली लावली जाते. जर तुमच्याकडे शिक्के एकत्रित केलेले असतील तर तुम्ही विकू शकता. काही लोकांना ही सवय असते की, नोटा, शिक्के जमा केले जातात. त्याचा फायदा या लोकांना होतो.
8 / 10
सिक्के विकण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्याकडे असलेल्या शिक्क्यांचा फोटो दोन्ही बाजूने काढावा लागेल आणि तो या वेबसाईटवर अपलोड करावा लागेल.
9 / 10
त्यानंतर लोक या शिक्क्यांवर बोली लावतील. जो जास्त पैसे तुम्हाला ऑफर करेल त्यांना तुम्ही शिक्का विकू शकता. ५ आणि १० पैशांवर बोली लावली जाते.
10 / 10
जर तुमच्याकडे ५ किंवा १० पैशांचे सिक्के असतील तर ते तुम्ही विकू शकता. परंतु हे शिक्के असे असावे ज्यावर वैष्णवी देवीचा फोटो असेल. २००२ मध्ये हे सिक्के जारी केले होते. तुम्ही हे शिक्के विकून पैसे कमवू शकता.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक