Bluestone Jewellery IPO: रतन टाटा यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा येणार IPO; मिळणार कमाईची मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 09:01 IST
1 / 8Bluestone Jewellery IPO: देशातील मोछी ओमनीचॅनल ज्वेलरी चेन Bluestone Jewellery १५०० कोटी रूपयांचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. या कंपनीत टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा (TATA Group Ratan Tata) यांची गुंतवणूकही आहे. 2 / 8Bluestone Jewellery नं यापूर्वीच या इश्यूसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज, जेफरीज आणि जेएम फायनॅन्शिअलला इन्व्हेस्टमेंट बँकर नियुक्त केलं आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार या कंपनीचं व्हॅल्युएशन १२ हजार कोटी रुपये ते १५ हजार कोटी रूपये असू शकतं.3 / 8२०२२-२०२३ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनी आपला IPO आणू शकते. हे ऑनलाइन मार्केटप्लेस Bluestone.com द्वारे ऑपरेट केले जाते. 4 / 8कंपनीचा इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल आहे. कंपनीचे खाजगी इक्विटी इन्व्हेस्टर्स त्यांचे स्टेक विकू शकतात. यामध्ये, कलारी कॅपिटलसह काही कंपन्या त्यांचा काही हिस्सा किंवा संपूर्ण हिस्साही विकू शकतात.5 / 8कंपनीचं व्हॅल्युएशन सध्या ठरवण्यात आलेलं नाही. कंपनी पुढील काही महिन्यात डीआरएचपी दाखल करू शकते, असं या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्रानं सांगितलं. 6 / 8ब्लूस्टोनचे मुंबईत दोन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत. कंपनीने २०१८ मध्ये पॅसिफिक मॉल, दिल्ली येथे आपलं पहिलं फिजिकल स्टोअर सुरू केले. याशिवाय कंपनी चंदीगड, मुंबई आणि हैदराबादमध्ये ५ नवीन स्टोअर उघडण्याच्या तयारीत आहे.7 / 8भारतातील दागिन्यांची बाजारपेठ जगातील सर्वात मोठी आहे. भारत कट हिरे, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि लॅबमध्ये बनवलेले हिरे यांचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. Technopak च्या मते, २०२० पर्यंत भारताचं ज्वेलरी सेक्टर ६४ अब्ज डॉलर्सचं झालं आहे.8 / 8ब्लूस्टोनच्या सूचीबद्ध प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये टायटनचा तनिष्क ब्रँड आहे. त्याचं मार्केट कॅप २.१९ लाख कोटी रुपये आहे. कल्याण ज्वेलर्सचे मार्केट कॅप २०,७६७ कोटी रुपये आहे. पीसी ज्वेलर्सचे मार्केट कॅप ६१२९ कोटी रुपये आहे.