शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala यांना मोठा झटका! २ महिन्यांत १३४० कोटी बुडाले; तुमच्याकडे आहे तो शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 11:52 PM

1 / 9
देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पेटीएमसारख्या शेअरने गुंतवणूकदारांची घोर निराशा केलेली असताना दुसरीकडे, अदानी विल्मरसारख्या शेअरने गुंतवणूकदार सुखावलेही आहेत.
2 / 9
मात्र, या सगळ्यात शेअर मार्केटचा बिग बुल नावाने ओळखल्या जाणाऱ्या Rakesh Jhunjhunwala यांना गेल्या दोन महिन्यांत १३४० कोटींचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमधील एका शेअरमुळे कोट्यवधी रुपये बुडाल्याचे म्हटले जात आहे.
3 / 9
Rakesh Jhunjhunwala यांच्या पोर्टफोलियोवर हजारो गुंतवणूकदारांची नजर असते. कोणता शेअर खरेदी करावा आणि कोणत्या शेअरची किती विक्री करावी, याबाबतचा निर्णय गुंतवणूकदार घेत असतात. राकेश झुनझुनवाला यांना स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या शेअरमुळे मोठे नुकसान झाले आहे.
4 / 9
स्टार हेल्थचा शेअर १० डिसेंबर २०२१ रोजी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला होता. Rakesh Jhunjhunwala यांचीही यामध्ये गुंतवणूक होती. त्यामुळे अन्य कंपन्यांप्रमाणे याच्या शेअरला गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, तसे झाले नाही.
5 / 9
स्टार हेल्थचा शेअर मुंबई शेअर मार्केट आणि एनएसईमध्ये अनुक्रमे ८४८ आणि ८४५ रुपयांवर सूचीबद्ध झाला. मात्र, या शेअरकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवली. आता दोन महिन्यांनंतर स्टार हेल्थचा शेअर ७७४ रुपयांपर्यंत खाली आला आहे. यामुळे Rakesh Jhunjhunwala यांना सुमारे १३४० कोटींचे नुकसान सोसावे लागल्याचे सांगितले जात आहे.
6 / 9
Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे स्टार हेल्थ इन्शुरन्सचे १०,०७,५३,९३५ शेयर्स आहेत. याची व्हॅल्यू ७,७९६.३ कोटी रुपये आहे. या शेअरच्या किमतीत दोन महिन्यांत १३२ रुपयांची घसरण झाली असून, यामुळे राकेश झुनझुनवाला यांचे १३४० कोटी रुपये बुडाले.
7 / 9
मात्र, दुसरीकडे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर Rakesh Jhunjhunwala यांना टाटाच्या एका कंपनीमुळे कोट्यवधींचा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांनी काही तासांत टायटनच्या शेअर्समध्ये सुमारे ३४२ कोटी रुपये कमावले आहेत.
8 / 9
अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये एकाच तासांत मोठी उसळी पाहायला मिळाली. टायटनच्या शेअर्सच्या वाढीमुळे Rakesh Jhunjhunwala यांच्या संपत्तीत अंदाजे ३४२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीच्या टायटन कंपनीत एकूण हिस्सा ५.०९ टक्के आहे.
9 / 9
Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे टायटनचे ३,५७,१०,३९५ शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या पेड-अप कॅपिटलच्या ४.०२ टक्के आहे. तर, पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये ९५,४०,५७५ शेअर्स आहेत आणि कंपनीमध्ये १.०७ टक्के हिस्सा आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजार