Multibagger Share: याला म्हणतात परतावा...! 20 पैशांच्या शेअरनं केली कमाल, 2 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹3.7 कोटी; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 05:02 PM2023-03-29T17:02:08+5:302023-03-29T17:08:07+5:30

या शेअरमध्ये केवळ एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारे लोक केवळ दोन वर्षांतच कोट्यधीश बनले आहेत.

शेअर बाजारातील घसरणीनंतरही असे अनेक शेअर्स आहेत. ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बाजारात घसरण असतानाही या शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे. यातील एक शेअर आहे राज रेयॉन इंडस्ट्रीजचा Raj Rayon Industries. या शेअरमध्ये अजूनही तेजी दिसत आहे.

या शेअरमध्ये केवळ एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारे लोक केवळ दोन वर्षांतच कोट्यधीश बनले आहेत. या स्टॉकने (Raj Rayon Industries) आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. याशेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा दिला आहे.

हा शेअरने गेल्या तीन वर्षांपासून रॉकेट स्पीड घेतला आहे. या शेअरने गेल्या एका वर्षात तब्बल 37 शे टक्क्यांचा परतावा दिला आहे. राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने बम्पर परतावा दिला आहे.

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 26 मार्च 2021 रोजी राज रेयॉन इंडस्ट्रीचा शेअर (Raj Rayon Industries Share) बीएसईवर केवळ 0.20 रुपयांवर होता. तो आज अर्थात 29 मार्च 2023 रोजी वाढून 65.20 रुपयांवर आला आहे. या दोन वर्षांत या शेअरची किंमत जवळपास 33 हजार टक्क्यांनी वाढली आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वीपर्यंत हा स्टॉक 16 रुपयांवर होता. या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 300 टक्के एवढा बम्पर परतावा दिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत शेअरमध्ये 80.22 टक्के एवढी तेजी आली आहे. यानुसार, जर एखाद्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी, या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर, त्याला आता 3.7 कोटी रुपयांचा बम्पर परतावावा मिळाला असता.

जर एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याला 38 लाख रुपये मिळाले असते. ही कंपनी पॉलिस्‍टर यार्न बनवणार्‍या देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)