रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:05 IST
1 / 9या महत्त्वाच्या दौऱ्यात भारत आणि रशियादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्र आणि संरक्षण अशा अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर चर्चा होऊन काही मोठे करार होण्याची शक्यता आहे.2 / 9गेल्या काही दिवसांत भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर गेला आहे (₹९०/$ पार). यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतो. रशियाचे अधिकृत चलन 'रशियन रुबल' आहे.3 / 9४ डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार, १ भारतीय रुपया हा सुमारे ०.८६ रुबल इतका आहे. याचा अर्थ, जर तुम्ही १०० भारतीय रुपये घेऊन रशियाला गेलात, तर तुम्हाला तेथे फक्त ८६ रुबल मिळतील. म्हणजेच, रशियात तुमच्या भारतीय १०० रुपयांचे मूल्य घटते.4 / 9हा विनिमय दर बाजारातील स्थिती, जागतिक तेल आणि वायूच्या किमती, दोन्ही देशांमधील व्यापार आणि रुबलची मागणी यावर आधारित असतो आणि तो सतत बदलत असतो. 5 / 9भारत आणि रशियाचे संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत. दोन्ही देश शस्त्रे, तेल आणि विविध वस्तूंची खरेदी-विक्री करतात. गेल्या चार वर्षांत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार पाच पटीने वाढला आहे. २०१३-१४ मधील १३ अब्ज डॉलरवरून २०२४-२५ मध्ये तो ६८ अब्ज डॉलर वर पोहोचला आहे.6 / 9दोन्ही देशांनी २०३० पर्यंत हा व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वित्त वर्ष २०२६ च्या एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत भारताची रशियाला झालेली निर्यात सुमारे १.८४ अब्ज डॉलर होती, तर रशियातून झालेली आयात २६.४५ अब्ज डॉलर इतकी मोठी होती.7 / 9भारत रशियाच्या अनेक प्रमुख गरजा पूर्ण करतो. आपला देश रशियाला प्रामुख्याने स्वस्त आणि दर्जेदार औषधे, रासायनिक उत्पादने, मशीनरी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू पुरवतो.8 / 9याशिवाय, तांदूळ, चहा, कॉफी, तंबाखू, भाज्या, द्राक्षे, मासे-कोळंबी आणि बेकरी/मांस उत्पादने यांसारख्या शेतीमालाची निर्यातही भारत रशियाला मोठ्या प्रमाणात करतो. याउलट, रशिया भारताला ऊर्जा साधने (तेल), खते आणि संरक्षण साहित्य (शस्त्रे) पुरवतो.9 / 9राष्ट्राध्यक्षांच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात व्यापार आणि आरोग्य सेवेसह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे द्विपक्षीय व्यापाराला मोठी चालना मिळेल.