भाडेकरू मालमत्तेवर ताबा मारण्याची भिती? मग हा कायदेशीर करार करेल संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 12:36 IST2024-12-29T12:34:02+5:302024-12-29T12:36:27+5:30

lease and license : भाड्याने मालमत्ता देताना घरमालकाला सर्वात मोठी भीती म्हणजे भाडेकरू घर किंवा दुकानावर ताबा तर मारणार नाही ना? हे टाळण्यासाठी घरमालक नेहमी भाडे करार करतात. परंतु, मालमत्तेसंबंधीचे असे वाद टाळण्यासाठी, भाडे कराराऐवजी दुसरे कायदेशीर दस्तऐवज बनवा, ज्यामुळे मालकी हक्क अधिक सुरक्षित होतात.

'लीज आणि लायसन्स' हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, जो जमीनमालकाच्या हिताचे पूर्णपणे संरक्षण करतो. विशेष म्हणजे आता मोठ्या शहरांमध्ये लोकांना अशी कागदपत्रे तयार करुन घ्यायला सुरुवात केली आहेत.

विशेष बाब म्हणजे या दस्तऐवजात अशा तरतुदी आहेत की भाडेकरूला मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा हक्क प्रस्थापित करण्याची संधी मिळणार नाही. भाडे कराराप्रमाणे ‘लीज आणि लायसन्स’ तयार करण्याची प्रक्रियादेखील सोपी आहे.

हे कायदेशीर कागदपत्र भाडे कराराप्रमाणेच आहे, त्यात काही कायदेशीर कलमे बदलली आहेत. भाडे करार हा मुख्यतः निवासी मालमत्तेसाठी केला जातो.

भाडे कराराचा कालावधी ११ महिने आहे. परंतु, लीज आणि लायसन्स करार १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी देखील केला जाऊ शकतो. भाडेपट्टी आणि परवाना निवासी आणि व्यावसायिक दोन्ही मालमत्तांसाठी लागू आहे.

लीज आणि लायसन्संचा कालावधी दहा दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत असू शकतो. हे कायदेशीर दस्तऐवज तुम्ही नोटरीद्वारे स्टॅम्प पेपरवर तयार करून घेऊ शकता.

भाडेकरू मालमत्तेवर कोणत्याही हक्काचा दावा करणार नाही किंवा मागणी करणार नाही, असे या करारात स्पष्टपणे लिहिलेले आहे, तर भाडे करारामध्ये याचा कुठेही उल्लेख नसतो.

लीज करार किंवा लीज आणि लायसन्स, दोन्ही कागदपत्रे मालमत्तेवरील मालकी हक्कांचे संरक्षण करतात. लीज आणि लायसन्समध्ये, घरमालकाची 'लाइसेन्सर' आणि भाडेकरू 'लाइसेन्सी' अशी स्पष्टपणे नोंद आहे.