वय वंदना योजना; फक्त एकदाच करा गुंतवणूक, दर महिन्याला पेन्शन मिळण्याची हमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:47 PM2021-06-17T18:47:04+5:302021-06-17T18:55:56+5:30

पेन्शन हे वरिष्ठ नागरिकांसाठी नियमित उत्पन्नाचे एक माध्यम आहे. अनेक फिक्स्ड डिपॉझिट आणि पेन्शन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक चांगले व्याज मिळत आहे. (Pradhan mantri vaya vandana yojana)

गेल्या काही वर्षांत फिक्स्ड डिपॉझिट आणि पेन्शन स्किमवरील व्याजदर कमी करण्यात आले आहेत. याचा परिणाम पेन्शन स्किम्सवरही झाला आहे. खरे तर, पेन्शन हे वरिष्ठ नागरिकांसाठी नियमित उत्पन्नाचे एक माध्यम आहे. अशात सरकारकडून चालविली जाणारी वय वंदना योजना एक आकर्षक पर्याय दिसतो. (Pradhan mantri vaya vandana yojana best government pension scheme)

वय वंदना योजनेत उत्तम व्याज - अनेक फिक्स्ड डिपॉझिट आणि पेन्शन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक चांगले व्याज मिळत आहे. खरे तर, कोरोना संकटाच्या काळात या योजनेचा व्याजदर कमी करण्यात आला आहे. हा व्याजदर आठ टक्क्यांवरून कमी होऊन 7.4 टक्क्यांवर आला आहे. मात्र, वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडल्यास वर्षाला 7.66 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात.

वय वंदना योजनेत एकदाच करावी लागते गुंतवणूक - वृद्धांना या पेन्शनसाठी वय वंदना योजनेत एकाचवेळी गुंतवणूक करावी लागेल. सरकार दरवर्षी 1 एप्रिलला समीक्षा करून या योजनेच्या व्याजात बदल करत असते. पेन्शन मासिक, तिमाही, सहामाही अथवा वार्षीक पद्धतीने घेतली जाऊ शकते.

किती करावी लागेल गुंतवणूक - नव्या बदलांनंतर महिन्याला 1 हजार रुपये एवढे मासिक पेन्शन हवे असल्यास ग्राहकांना किमान 1.62 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तिमाही पेन्शनसाठी 1.61 लाख, सहामाही पेन्शनसाठी 1.59 लाख तर वार्षिक पेन्शन हवी असल्यास किमान 1.56 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

अधिकांश मासिक पेन्शन 9250 रुपये - वय वंदना योजनेत अधिकांश मासिक पेन्शन 9250 रुपये मिळेल. तर तिमाही पेन्शन 27,750 रुपये, सहामाही पेन्शन 55,500 रुपये आणि अधिकांश वार्षिक पेन्शन 1,11,000 रुपये मिळण्याची तरतूद आहे. या योजनेत कुणीही गुंतवणूकदार जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंतचीच गुंतवणूक करू शकतो. गुंतवणुकीचे नियम - आपण 2021 रोजी 15 लाख रुपये गुंतवले, तर आपल्याला 2031पर्यंत दरवर्षी 7.4 टक्के निश्चित व्याज मिळत राहील. गुंतवणूकदार 10 वर्षांच्या पॉलिसी कालावधीनंतरही जिवंत राहिला, तर त्याला पेन्शनच्या शेवटच्या हप्त्यासह गुंतवणूक करण्यात आलेले सर्व पैसे परत मिळतील. तसेच एखाद्या गुंतवणूकदाराचा पॉलिसीच्या कालावधीदरम्यानच मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला गुंतवणूक करण्यात आलेली सर्व रक्कम मिळेल.

गुंतवणुकीचे नियम - आपण 2021 रोजी 15 लाख रुपये गुंतवले, तर आपल्याला 2031पर्यंत दरवर्षी 7.4 टक्के निश्चित व्याज मिळत राहील. गुंतवणूकदार 10 वर्षांच्या पॉलिसी कालावधीनंतरही जिवंत राहिला, तर त्याला पेन्शनच्या शेवटच्या हप्त्यासह गुंतवणूक करण्यात आलेले सर्व पैसे परत मिळतील. तसेच एखाद्या गुंतवणूकदाराचा पॉलिसीच्या कालावधीदरम्यानच मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला गुंतवणूक करण्यात आलेली सर्व रक्कम मिळेल.

कुणासाठी आहे ही योजना? पंतप्रधान वय वंदना योजनेअंतर्गत (PMVVY) वृद्धांसाठी पेन्शनची व्यवस्था केली जाते. ही योजना एलआयसीअंतर्गत ठेवण्यात आली आहे. पेन्शन स्‍किम असल्याने वयाच्या 60 वर्षांनंतर या योजनेचा लाभ मिळू शकतो. या स्किमचा लाभ घेण्याची डेडलाइन मार्च 2023 पर्यंतची आहे.

पेन्शन स्‍किमचे फायदे - या पेन्शन स्किमचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, गुंतवणूकदाराचा मधेच मृत्यू झाल्यास नॉमिनीला गुंतवणूक केलेले पैसे परत मिळतात. पॉलिसी घेताना गुंतवणूकदाराने गुंतवलेली रक्कम 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर परत मिळते.

गुंतवणुकीच्या 3 वर्षांनंतर लोन घेण्याचीही व्यवस्था आहे. याच बरोबर काही विशेष परिस्थितीत pre-mature withdrawal चीदेखील परवानगी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे, या पेन्शन स्‍किममध्ये मेडिकल एक्झामिनेशनचीही आवश्यकता नाही.

असा आहे हेल्‍पलाइन क्रमांक - पंतप्रधान वय वंदना योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी आपण 022-67819281 अथवा 022-67819290 या क्रमांकावर कॉल करू शकता. याशिवाय टोल फ्री क्रमांक- 1800-227-717 आणि ईमेल आयडी- onlinedmc@licindia.com च्या माध्यमानेही स्‍किमसंदर्भात माहिती मिळवू शकता.