शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 09:44 IST

1 / 9
Post Office Investment Scheme: तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल आणि तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासोबतच त्यावर मोठा परतावा मिळावा अशी तुमची इच्छा असेल, तर पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीम्स (PO Small Saving Schemes) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
2 / 9
सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून प्रत्येक वयोगटासाठी बचत योजना चालवत आहे, ज्यामध्ये प्रत्येक लहान-मोठ्या गुंतवणुकीवर सुरक्षेची हमी खुद्द सरकार देते. अशीच एक योजना आहे पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट स्कीम (Post Office Recurring Deposit), ज्यामध्ये दररोज फक्त ४०० रुपयांची बचत करून तुम्ही २० लाख रुपयांचा मोठा फंड जमा करू शकता. चला तर मग, समजून घेऊया याचं पूर्ण कॅल्क्युलेशन...
3 / 9
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांच्या व्याजदरात दर तीन महिन्यांनी बदल केला जातो. जर पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग स्कीमच्या व्याजदराबद्दल बोलायचं झाले, तर ५ वर्षांच्या गुंतवणुकीवर सरकारकडून या योजनेत ६.७० टक्के व्याज दिलं जात आहे. यामध्ये अवघ्या १०० रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीसह खातं उघडता येतं. या सरकारी योजनेत तुमची नियमित लहान गुंतवणूक मोठा फंड उभा करण्यास मदत करू शकते.
4 / 9
या सरकारी योजनेत कोणीही आपलं खातं उघडू शकतात. विशेष म्हणजे १० वर्षांच्या अल्पवयीन मुलाचंही खातं उघडता येतं. मात्र, त्याला पालकांच्या मदतीनं खातं उघडावं लागेल.
5 / 9
अल्पवयीन मुल १८ वर्षांचं झाल्यावर नवीन KYC आणि फ्रेश ओपनिंग फॉर्मसह अपडेट करून स्वतः खातं हाताळू शकेल. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे, परंतु गुंतवणूकदाराला हवं असल्यास तो पुढील ५ वर्षांसाठी वाढवता येतो.
6 / 9
इतर फायद्यांचा विचार केल्यास, जर एखाद्या गुंतवणूकदाराला काही कारणास्तव ही योजना मुदतीपूर्वी बंद करायची असेल, तर ती सुविधाही मिळते. गुंतवणूकदार ३ वर्षांनंतर प्री-मॅच्युअर क्लोजरचा पर्याय निवडू शकतो. तसेच, खातेदाराचा काही कारणास्तव मृत्यू झाल्यास, नॉमिनी यावर दावा करू शकतो किंवा हवे असल्यास ही योजना पुढे सुरू ठेवू शकतो.
7 / 9
सरकारी योजना केवळ चांगल्या परताव्यासाठीच लोकप्रिय नाहीत, तर त्यामध्ये इतरही अनेक फायदे दिले जातात. पोस्ट ऑफिसच्या या रिकरिंग डिपॉझिट योजनेत गुंतवणूकदाराला कर्जाची सुविधाही दिली जाते. याअंतर्गत, एक वर्ष खातं सुरू राहिल्यानंतर जमा रकमेच्या ५० टक्क्यांपर्यंत कर्ज घेता येतं, ज्यावर २% दरानं व्याज लागू होते. तुम्ही कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खातं उघडू शकता.
8 / 9
आता, या सरकारी योजनेत फक्त ₹४०० च्या नियमित गुंतवणुकीसह, तुम्ही ₹२० लाखांचा निधी कसा जमा करू शकता ते पाहूया. ही गोष्ट अगदी सोपी आहे. खरं तर, पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार जर एखादा गुंतवणूकदार दररोज ४०० रुपयांची बचत करतो, ज्याचा अर्थ दरमहा ₹१२,००० होतो. जर त्यानं ही रक्कम पोस्ट ऑफिस आरडी योजनेत गुंतवली, तर पाच वर्षांच्या मुदतपूर्ती कालावधीनंतर त्यांचा निधी ₹८,५६,३८८ होईल.
9 / 9
जर गुंतवणूकदारानं त्याची गुंतवणूक आणखी पाच वर्षांसाठी वाढवली तर या कालावधीत त्यांची गुंतवणूक ₹१४.४० लाख असेल, तर एकूण निधी ₹२०,५०,२४८ असेल. यापैकी ₹६,१०,२४८ केवळ व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न असेल.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा