शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office PPF Scheme: सरकारच्या 'या' स्कीममध्ये गुंतवा ४१७ रुपये, मॅच्युरिटीवर मिळतील १ कोटी; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 10:43 AM

1 / 8
भविष्यात स्वत:साठी चांगला निधी जमा करायचा असेल तर बचत हा सर्वोत्तम पर्याय आहे. सरकार बचतीसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे जलद वाढवू शकता.
2 / 8
आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही दरमहा काही रुपये वाचवून स्वतःसाठी मोठा निधी जमा करू शकता. या योजनेत (PPF स्कीम) तुम्ही दर महिन्याला फक्त 417 रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 1 कोटी रुपये मिळतील. सरकारची ही योजना सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.
3 / 8
ज्या योजनेबद्दल तुम्हाला सांगत आहोत ती म्हणजे पब्लिक प्रोविडेंट फंड. या योजनेत तुम्हाला वार्षित 7.1 टक्क्यांचं व्याज मिळतं. याध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी कपांऊंडं इंटरेस्टचा फायदादेखील मिळतो.
4 / 8
या योजनेमध्ये मॅच्युरिटी पीरिअड 15 वर्षांचा आहे. याला तुम्ही दोन वेळा पाच पाच वर्षांसाठी वाढवू शकता. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना टॅक्स बेनिफिटही मिळतं.
5 / 8
जर तुम्हाला या योजनेत (Post Office PPF Scheme) मॅच्युरिटीच्या वेळी एक कोटी रुपयांचा निधी जमा करायचा असेल, तर तुम्हाला अशा प्रकारे गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये तुम्हाला वार्षिक 1.5 लाख रुपये जमा करावे लागतील. जर कोणी या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर त्याला दररोज 417 रुपये जमा करावे लागतील.
6 / 8
दररोज 417 रुपये म्हणजेच दर महिन्याला 12500 रुपये गुंतवणूक जमा करावी लागेल. जर त्याने हे 15 वर्षांसाठी केले तर यानुसार त्याची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये होईल. मॅच्युरिटीच्या वेळी, तुम्हाला 7.1 टक्क्यांच्या वार्षिक व्याजासह कंपाऊंडींगचाही लाभ देखील मिळेल.
7 / 8
मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजाच्या रुपात 18.18 लाख रुपये मिळतील. अशात तुम्हाला एकूण 40.68 लाख रुपये मिळतील. यात 15 वर्षांच्या कालावधी पूर्ण झाल्यानंत याचा कालावधी 5 वर्षांनी वाढवला जाऊ शकतो. जर तुम्ही 5 वर्ष तुम्ही 1.5 लाखांची गुंतवणूक करत राहिलात तर 25 वर्षांनंतर तुमचा पीपीएफ बॅलन्स जवळपास 1 कोटी रुपये होईल.
8 / 8
पीपीएफमध्ये तुम्हाला परताव्याची हमी मिळते. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना टॅक्स बेनिफिटही मिळतं. या योजनेचा लाभ तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ अकाऊंट उघडूनही करू शकता. यामध्ये तुम्ही जॉईंट अकाऊंट उघडू शकत नाही. एनआरआयदेखील या योजनेद्वारे खातं उघडू शकत नाहीत.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकPost Officeपोस्ट ऑफिसMONEYपैसा