शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Post Office च्या 'या' स्कीममध्ये दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज; पाहा किती रुपयांची करावी लागेल गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 08:37 IST

1 / 7
Post Office Savings Scheme: पोस्ट ऑफिस देशातील नागरिकांच्या गरजांवर आधारित अनेक प्रकारच्या बचत योजना चालवत आहे. पोस्ट ऑफिसमध्ये टीडी (TD), आरडी (RD), एमआयएस (MIS), पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) या व्यतिरिक्त इतरही अनेक प्रकारची खाती उघडली जातात.
2 / 7
आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका अशा योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महिन्याला हमीसह ५५५० रुपयांचे निश्चित व्याज मिळेल. व्याजाचे हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील, जे तुम्ही हवे असल्यास खात्यात ठेवू शकता किंवा गरजेनुसार काढू शकता.
3 / 7
आम्ही पोस्ट ऑफिसच्या एमआयएस म्हणजेच मासिक उत्पन्न योजनेबद्दल (Monthly Income Scheme) बोलत आहोत. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते, त्यानंतर तुमच्या बँक खात्यात दर महिन्याला व्याजाचे निश्चित पैसे येणं सुरू होतं.
4 / 7
पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना मासिक उत्पन्न योजनेवर सध्या ७.४ टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही फक्त १००० रुपयांपासूनही खातं उघडू शकता. या योजनेअंतर्गत, सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. तर, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त १५ लाख रुपये जमा करण्याची मर्यादा आहे. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त ३ लोकांना सामील करता येते.
5 / 7
पोस्टाच्या एमआयएस योजनेत खातं उघडताच तुमच्या खात्यात दर महिन्याला व्याजाचे पैसे जमा होऊ लागतात. ही योजना ५ वर्षांत मॅच्युअर होते. परिपक्वतेवर तुमच्या एमआयएस खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
6 / 7
मासिक उत्पन्न योजनेत खाते उघडण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचंच बचत खातं असणं आवश्यक आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत ९ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर तुम्हाला ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला ५५५० रुपयांचे निश्चित व्याज मिळणं सुरू होईल.
7 / 7
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा