Petrol-Diesel Price Hike Today : पुन्हा इंधनाचा भडका; पेट्रोल-डिझेलची पुन्हा दरवाढ, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 08:34 AM2021-10-11T08:34:44+5:302021-10-11T08:40:03+5:30

Todays Petrol Diesel Rate : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होत आहे पेट्रोल-डिझेलची दरवाढ.

Petrol-Diesel Price Today 11 October 2021: गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) वाढत्या किंमतींमुळे ही दरवाढ केली जात असल्याचं म्हटलं जात आहे.

देशभरात यापूर्वी पेट्रोलच्या दरानं १०० रूपयांचा दर पार केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर कात्री लागली आहे. भारतात अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचे दर १०० रूपयांपेक्षा अधिक आहेत. आता डिझेलच्या दरानंही काही राज्यांमध्ये १०० रूपयांचा आकडा पार केला आहे.

देशात सोमवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली. पेट्रोलच्या दरात ३० पैसे प्रति लीटर आणि डिझेलच्या गरात ३५ पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली.

इंडियन ऑईल (IOCL) च्या माहितीनुसार दिल्लीत पेट्रोलचे दर १०४.४४ रूपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. तर मुंबईतही पेट्रोलचे दर ११०.४१ रूपये प्रति लीटर इतके झाले आहेत. याशिवाय आता मुंबईत डिझेलचे दर १०१.०३ रूपये प्रति लीटर झाले आहेत. दिल्लीतही डिझेलचे दर आता ९३.१७ रूपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं इंधन दरवाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत केवळ ४ ऑक्टोबर रोजी इंधनाचे दर स्थिर होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत ८२ डॉलर्स प्रति बॅरलच्या पुढे गेली आहे.

एका महिन्यापूर्वी ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत ७२ डॉलर्स प्रति बॅरल होती. याशिवाय स्थानिक करांमुळे निरनिराळ्या राज्यांमध्ये इंधनाचे दर निरनिराळे आहेत.

मुंबई-हैदराबादनंतर आता गुजरातमधील गांधीनगर येथे तसंच केंद्रशासित प्रदेश लेहमध्ये डिझेलचे दर १०० रूपयांच्या पुढे गेले आहे. भोपाळ, रायपूर, जयपूरमध्ये यापूर्वीच डिझेलचे दर १०० रूपयांच्या पुढे गेले आहे. गेल्या सात दिवसांपासून पेट्रोलचे दर ३० पैसे प्रति लीटर वाढत आहेत आणि डिझेलच्या किंमतीत ३५ पैशांची वाढ होत आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर दररोज अपडेट करण्यात येतात. अशातच एका एसएमएसद्वारे तुम्ही आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊन शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी https://iocl.com/petrol-diesel-price या लिंकवर क्लिक करा.