शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Petrol Diesel Price: पेट्रोलचा दर १२५ रुपये होणार? इंधनदरवाढीवर तज्ज्ञांचा इशारा; ‘हे’ आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 1:30 PM

1 / 10
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. एकीकडे कोरोना संकटाचा काळ असताना दुसरीकडे इंधनदरवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे.
2 / 10
गेल्या दोन महिन्यात कंपन्यांनी तब्बल ३० वेळा इंधन दरवाढ केली आहे. या दरवाढीने पेट्रोल ७.४४ रुपयांनी महागले आहे. तर याच कालावधीत डिझेल ७.५२ रुपयांनी महागले आहे.
3 / 10
सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर ठरत असल्याचे सांगत आहे. तसेच इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
4 / 10
क्रूड ऑईलचे दर वर्षभरात २६ डॉलर प्रती बॅरलने वाढले असून, जून २०२० मध्ये ४० डॉलर असलेले दर ७६ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. यातच आता १ जुलैला OPEC+ देशांची बैठक होणार आहे.
5 / 10
या बैठकीत उत्पादन धोरणावर निर्णय होणार असून, रशिया क्रूड ऑईलचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने आहे. तसेच या बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात.
6 / 10
महसूल घटल्यामुळे भारत सरकारकडून दरात कपात करण्याची शक्यता फारच धुसर आहे. त्यामुळे आताच्या दरानुसार, डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर प्रती लीटर १२५ रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.
7 / 10
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील वाढ कायम आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील महागाई दरावर होत आहे. इराणवर अमेरिकेने लादलेल्या बंधनामुळेही कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत राहतात.
8 / 10
शुक्रवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा दर १०३.८९ रुपयांवर कायम असून, दिल्लीत पेट्रोल ९७.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ९८.८८ रुपये भाव आहे.
9 / 10
कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९७.६३ रुपये असून, भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०५.९९ रुपये आहे. मुंबईत डिझेलचा दर एका लीटरसाठी ९५.७९ रुपये आहे.
10 / 10
तर, चेन्नईत ९२.८९ रुपये आणि कोलकात्यात ९१.१५ रुपये डिझेलचा भाव आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७ रुपये झाला आहे. पाच राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी सुरु केलेली इंधन दरवाढ अद्याप थांबलेली नाही.
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय