LPG Offer: घरगुती गॅस सिलेंडरवर मिळतेय ८०० रुपये घसघशीत सूट; ३१ मे पर्यंत ऑफर मर्यादित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 08:14 PM2021-05-06T20:14:41+5:302021-05-06T20:19:46+5:30

LPG Gas Offer: डिजिटल पेमेंट App ने घरगुती गॅस सिलेंडरवर कॅशबॅक ऑफर ठेवली आहे.

पेट्रोल-डिझेल या महिन्यात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. घरगुती गॅसही ८०९ रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सूट मिळू शकत नाही कारण त्याचे दर तेल कंपन्यांच्या हातात असतात.

देशात कोरोना महामारी आल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आलं. अनेक व्यवहार ठप्प झाले. बहुसंख्य बेरोजगार झाले. देशात अशी परिस्थिती असली तरी महागाईनंही सर्वसामान्यांचे कंबरडं मोडलं आहे.

परंतु, तुम्हाला घरगुती LPG गॅसवर सिलेंडरवर घसघशीत सूट मिळू शकते. तेदेखील तब्बल ८०० रुपयांपर्यंत. ही सूट कशी मिळेल याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

LPG गॅस सिलेंडरच्या बुकींगवर पेटिएम(Paytm) नं ग्राहकांना बंपर ऑफर दिली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना ८०९ रुपयांचे गॅस केवळ ९ रुपयात मिळू शकतो. या कॅशबॅक अंतर्गत जर तुम्ही पहिल्यांदा पेटिएमच्या माध्यमातून गॅस बुक कराल तर तुम्हाला ८०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

जर तुम्हाला पेटिएमच्या या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी ३१ मेपर्यंत संधीचा फायदा घेता येईल. ही ऑफर फक्त त्याच ग्राहकांना आहे जे पहिल्यांदा LPG गॅस सिलेंडर बुकींग आणि पेमेंट Paytm वरून करतील.

जेव्हा तुम्ही LPG सिलेंडर बुकींग आणि पेमेंट कराल तेव्हा तुमच्या स्क्रीनवर एक स्क्रॅच कार्ड मिळेल. ज्याची कॅशबॅक रक्कम ८०० रुपयापर्यंत असेल. ही ऑफर आपोआप पहिल्या LPG गॅस सिलेंडरच्या बुकींगवर मिळणार आहे.

या ऑफरसाठी मिनिमम ५०० रुपये पेमेंट करावा लागेल. कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला स्क्रॅच कार्ड ओपन करावं लागेल. जे तुम्हाला बिल पेमेंट केल्यानंतर प्राप्त होईल. कॅशबॅकची रक्कम १० रुपये ते ८०० रुपये पर्यंत असेल. हे स्क्रॅच गार्ड ७ दिवसांच्या आत ओपन करावं लागेल. त्यानंतर त्याचा वापर होणार नाही.

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्वत:च्या मोबाईलवर paytm app डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर गॅस सिलेंडरची बुकींग करावी लागणार आहे. त्यासाठी paytm वर Show More या पर्यायावर जाऊन क्लिक करावं लागेल.

याठिकाणी Recharge & Bills Pay असा पर्याय असेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला बुक सिलेंडरचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन तुम्ही गॅस प्रोव्हाडर सिलेक्ट करा. बुकींगच्या आधी तुम्हाला FIRSTLPG चा प्रोमो कोड टाकावा लागेल.

बुकींगच्या २४ तासांत तुम्हाला कॅशबॅकचा स्क्रॅच कार्ड मिळेल. या स्क्रॅच कार्डचा वापर ७ दिवसांच्या कालावधीत करू शकता.