शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेटीएमने लाँच केले Paytm Wallet Card, आता कोठेही वापरू शकता वॉलेट बॅलन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 4:12 PM

1 / 8
नवी दिल्ली : किराणा दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी, पाणी आणि विजेचे बिल भरण्यासाठी, गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी, मोबाईल आणि डीटीएच रिचार्ज करण्यासाठी किंवा ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी तुम्ही पेटीएम वॉलेटचा (Paytm Wallet) वापर करता.
2 / 8
ज्या ठिकाणी पेटीएम वॉलेटमधून पेमेंट स्वीकारले जाते, त्याठिकाणी तुम्ही पेटीएम वॉलेटमधून पेमेंट करता. मात्र, पेटीएम वॉलेटमधून पेमेंट स्वीकारले जात नाही, त्याठिकाणी इतर पेमेंट मोड वापरावे लागते. पण, लवकरच पेटीएमचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
3 / 8
दरम्यान, पेटीएमने (Paytm) एक प्रीपेड रुपे कार्ड पेटीएम वॉलेट कार्ड (Paytm Wallet Card) लाँच केले आहे. हे कार्ड रुपे (Rupay) स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी दुकानांवर वापरले जाऊ शकते.
4 / 8
पेटीएम वॉलेट कार्ड (Paytm Wallet Card) हे प्रीपेड कार्ड आहे, जे तुमच्या पेटीएम वॉलेट बॅलन्सला लिंक केलेले असेल. हे कार्ड रूपे प्लॅटफॉर्मवर सादर करण्यात आले आहे. सध्या ते व्हर्च्युअल कार्डच्या स्वरूपात दिले जात आहे आणि लवकरच फिजिकल कार्डही दिले जाईल.
5 / 8
हे एक्सपायरी डेट आणि सीव्हीव्ही क्रमांकासह 16 अंकी कार्ड असेल. या कार्डद्वारे, तुम्ही तुमचे वॉलेट बॅलन्स ऑनलाईन आणि ऑफलाइन वापरू शकाल जिथे रुपे कार्डद्वारे पेमेंट घेतले जाईल.
6 / 8
उदाहरणार्थ, तुमचे पेटीएम वॉलेट बॅलन्स 500 रुपये आहे आणि तुम्ही अशा दुकानात सामान खरेदी करत आहात जिथे स्वाइप मशीन (POS)आहे, पण पेटीएम वॉलेटचा ऑप्शन नाही. अशा परिस्थितीत, तुमच्या फिजिकल पेटीएम वॉलेट कार्डच्या मदतीने तुम्ही स्वाइप मशीनद्वारे 500 रुपयांचे पेमेंट करू शकाल.
7 / 8
त्याचप्रमाणे, कोणतेही ऑनलाईन मर्चेंट जे पेटीएम वॉलेटमधून पेमेंट घेत नाहीत, त्यांना डेबिट / क्रेडिट कार्डचा ऑप्शन निवडावा लागेल आणि पेटीएम वॉलेट कार्डचा 16 अंकी क्रमांक, एक्स्पायरी डेट आणि सीव्हीव्ही टाकून पेमेंट करावे लागेल.
8 / 8
सर्वात आधी पेटीएम अॅप ओपन करा. होम पेजवर My Paytm सेक्शनमध्ये जाऊन Paytm Wallet वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला खालती पेटीएम वॉलेट कार्ड अॅक्टिव्ह करण्याचा ऑप्शन मिळेल. सध्या हे कार्ड निवडक वापरकर्त्यांना दिले जात आहे.
टॅग्स :Paytmपे-टीएमbusinessव्यवसायonlineऑनलाइनMONEYपैसा