शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०० वरून पोहोचला ९०० वर! अजय देवगणकडेही आहेत १ लाख शेअर्स, पकडला रॉकेट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 2:19 PM

1 / 9
पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनलचा स्टॉक शेअर बाजारात सध्या चर्चेत आहे. कंपनीचा हा शेअर शुक्रवारी २ टक्क्यांनी वाढून ९०२.१० रूपयांवर बंद झाला.
2 / 9
हा शेअर वाढण्यामागील प्रमुख कारण म्हणजे शैतान चित्रपट. पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनलमध्ये बनलेल्या शैतान चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली. चित्रपटाने केवळ ८ दिवसांत ८९ कोटी रूपयांची कमाई केली.
3 / 9
पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनलमध्ये बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची मोठी गुंतवणूक आहे. अलीकडेच त्याने कंपनीचे १ लाख शेअर खरेदी केले आहेत.
4 / 9
अजय देवगणने २७४ रूपयांच्या किंमतीत एक लाख शेअर खरेदी केले, ज्यांची एकूण किंमत २.७४ कोटी रूपये होती. ४ मार्च रोजी या गुंतवणूकीचे मूल्य तीन पटीने वाढले.
5 / 9
अजय देवगणने पॅनोरमा स्टुडिओ आणि त्याचे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी निर्मित केलेल्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात 'दिल तो बच्चा है जी', रेड आणि दृश्यम यांचा समावेश आहे.
6 / 9
त्याने अलीकडेच हंबल मोशन पिक्चर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज (JIO स्टुडिओ) सोबत कॅरी ऑन जेटिये, अरदास ३ आणि मंजे बिस्तरे ३ या तीन पंजाबी चित्रपटांसाठी सहयोग केला आहे.
7 / 9
दरम्यान, पॅनोरमा स्टुडिओने दृश्यम फ्रँचायझीच्या हॉलीवूड रिमेकसाठी गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि JOAT फिल्म्ससोबत हातमिळवणी केली आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत १० देशांमध्ये 'दृश्यम'चे निर्माण करण्याचे चेअरमन पाठक यांचे लक्ष्य आहे.
8 / 9
निर्माता आणि टॅलेंट मॅनेजर या दोन्ही रूपात अजय देवगणसोबतचे त्यांचे जवळचे नाते असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
9 / 9
मागील सहा महिन्यात पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनलच्या शेअरने ३२५% परतावा दिला आहे. यावर्षी YTD मध्ये आतापर्यंत १५०% आणि वर्षभरात हा शेअर ८००% वधारला आहे. (टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारAjay Devgnअजय देवगणInvestmentगुंतवणूक