शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UAN तर एक आहे, पण दोन पेक्षा अधिक EPF Account आहेत; कसं कराल मर्ज, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 9:33 AM

1 / 8
तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असाल आणि आत्तापर्यंत अनेक नोकऱ्या बदलल्या असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाते तेव्हा त्याचे ईपीएफ खाते त्या कंपनीद्वारे उघडलं जातं.
2 / 8
बऱ्याच वेळा एखाद्या कर्मचाऱ्याचा असा गैरसमज असतो की जर त्याचा UAN नंबर एक असेल तर त्याचे EPF खाते देखील एकच असेल. पण असं नाही, नोकरी बदलल्यानंतर नवीन कंपनी तुमचं नवीन खातं उघडते.
3 / 8
अशा परिस्थितीत, तुमच्याकडे एका UAN अंतर्गत अनेक EPF खाती होतात. ही खाती एकत्र केल्याशिवाय, तुमची संपूर्ण शिल्लक एकाच ठिकाणी दिसणार नाही. जर तुम्हाला तुमचं ईपीएफ खातं एकत्र करायचं असेल, तर तुम्ही ही प्रक्रिया घरी बसून सहज पूर्ण करू शकता. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊ.
4 / 8
खाती एकत्र करण्यासाठी, प्रथम तुम्हाला EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/ वर जावं लागेल. यानंतर सर्व्हिसेस या सेक्शनमध्ये जा आणि For Employees वर क्लिक करा.
5 / 8
यानंतर एक नवीन पेज उघडेल. इथे तुम्हाला One Employee - One EPF खातं या पर्यायावर जावे लागेल. यानंतर, जे पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करावं लागेल.
6 / 8
यानंतर, जे पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला जुन्या ईपीएफ खात्याची माहिती दिसेल. त्यानंतर EPF खातं क्रमांक टाका आणि सबमिट वर क्लिक करा. यानंतर तुमचं ईपीएफ खातं मर्ज करण्याचा अर्ज पूर्ण होईल. तुमच्या वर्तमान नियोक्त्याला ते मंजूर करावं लागेल. त्यानंतर ईपीएफओ ​​तुमचं जुनं खातं नवीन खात्यात मर्ज करेल.
7 / 8
ईपीएफ खातं मर्ज करण्यासाठी तुमचा UAN क्रमांक सक्रिय करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचा UAN नंबर माहित नसेल तर तुम्ही ते देखील शोधू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. येथे, खाली Important Links मध्ये Know your UAN असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
8 / 8
यानंतर तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा एन्टर करा आणि त्यानंतर रिक्वेस्ट OTP वर क्लिक करा. OTP द्वारे पडताळणी पूर्ण केल्यानंतर, एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला नाव, जन्मतारीख, आधार/पॅन/सदस्य आयडी आणि कॅप्चा इत्यादी माहिती एन्टर करावी करावी लागेल. त्यानंतर Show My UAN Number वर क्लिक करा, तुमचा UAN तुमच्या समोर असेल.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधी