नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 10:56 IST
1 / 7दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्या इंधन आणि गॅसच्या किमतींचा आढावा घेतात. सध्या सर्वाधिक लक्ष १४ किलोग्रामच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दराकडे लागले आहे. या दरांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बदल झालेला नाही. सणासुदीच्या तोंडावर या दरवाढीतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच CNG, PNG आणि ATF (विमान इंधन) यांच्या किमतींमध्येही संशोधन होण्याची शक्यता आहे.2 / 7रेल्वे तिकीट बुकिंगमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी इंडियन रेल्वे मोठा नियम लागू करत आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून, रिझर्व्हेशन उघडल्यानंतर पहिली १५ मिनिटे फक्त तेच प्रवासी ऑनलाइन तिकीट बुक करू शकतील, ज्यांचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन झालेले आहे. ध्या हा नियम फक्त 'तत्काळ बुकिंग'साठी लागू आहे, पण आता तो सामान्य ऑनलाइन बुकिंगलाही लागू होईल. कॉम्प्युटराइज्ड पीआरएस काउंटरवर तिकीट घेणाऱ्यांसाठी नियम पूर्वीप्रमाणेच राहतील.3 / 7नॅशनल पेन्शन सिस्टिम, अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांशी जोडलेल्या पेन्शनधारकांसाठी नियमांमध्ये बदल होणार आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सीकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कात बदल केले आहेत.4 / 7आता PRAN (Permanent Retirement Account Number) उघडण्यासाठी E-PRAN किटसाठी १८ रुपये आणि फिजिकल कार्डसाठी ४० रुपये शुल्क लागेल. वार्षिक मेंटेनन्स चार्ज १०० रुपये असेल. APY आणि NPS लाईट ग्राहकांसाठी PRAN उघडणे आणि वार्षिक मेंटेनन्स चार्ज दोन्हीसाठी फक्त १५ रुपये आकारले जातील, तर ट्रान्झॅक्शन चार्ज शून्य असेल.5 / 7युनिफाइड पेमेंट इंटरफेस वापरकर्त्यांसाठी हा एक मोठा बदल असू शकतो. राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पीअर-टू-पीअर (P2P) ट्रान्झॅक्शन फीचर बंद करू शकते, अशी चर्चा आहे. सायबर सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि आर्थिक फसवणूक रोखणे हा या बदलामागील मुख्य उद्देश आहे. १ ऑक्टोबरपासून PhonePe, Google Pay, Paytm सारख्या ॲप्समधून हे फीचर हटवले जाऊ शकते.6 / 7ऑक्टोबर महिन्यात सणांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार, या महिन्यात एकूण २१ दिवस बँका बंद राहणार आहेत. दुर्गापूजा, महात्मा गांधी जयंती, दसरा, लक्ष्मी पूजा, दिवाळी, भाऊबीज आणि छठपूजा यांसारख्या प्रमुख सणांच्या सुट्ट्या यात समाविष्ट आहेत.7 / 7यामध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारचा साप्ताहिक अवकाशही समाविष्ट आहे. तुम्हाला बँकेत काही महत्त्वाचे काम असल्यास, त्यापूर्वी आरबीआयची सुट्ट्यांची यादी तपासूनच घरातून बाहेर पडा. लक्षात घ्या, या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात.