शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता नो झंझट, 'एक देश एक चार्जर' संकल्पनेला मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 3:43 PM

1 / 8
अनेकदा आपला मोबाईल बदलला की चार्जर बदलतो, त्यामुळे प्रवासात किंवा बाहेर असताना अनेकदा चार्जर सोबत बाळगणे ही बाब त्रासदायक वाटते. मात्र, आता एक देश एक चार्जर ही संकल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे.
2 / 8
कारण, भारतात सर्वच गॅझेटसाठी आता एकच चार्जर वापरण्यास कंपन्यांकडून सहमती मिळाली आहे. मोबाईल कंपन्यांसह या क्षेत्रातील इतरही कंपन्यानी या संकल्पनेसाठी तयारी दर्शवली आहे. ग्राहक मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
3 / 8
ग्राहक मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांच्या अध्यतेखाली टास्क फोर्सची एक बैठक झाली. त्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
4 / 8
त्यानुसार, आता एकच चार्जर अंतिम करण्यासाठी एक-एक टीम बनविण्यात आली आहे. मात्र, अद्यापही सी टाईपचा किंवा इतर कुठल्याही चार्जरसाठी अंतिम निर्णय झाला नाही.
5 / 8
या बैठकीत MAIT, FICCI, CII, IIT कानपुर, IIT (BHU) सह अनेक शैक्षणिक संस्थांसह पर्यावरण मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
6 / 8
बैठकीनंतर सर्वच प्रतिनिधींनी एक कॉमन चार्जिंग पोर्ट जारी करण्याबाबतच्या चर्चेवर सहमती दर्शवली.
7 / 8
त्यामध्ये, अनेकांनी स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर काही गॅझेटसाठी USB Type-C चार्जवर सहमती दर्शवली आहे. तर, फिचर्स फोनसाठी वेगळा चार्जरही सुचविण्यात आला आहे.
8 / 8
दरम्यान, एकाच प्रकारचा चार्जर वापरात येण्याचा निर्णय हा सीओपी-26 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदींद्वारे सुरू करण्यात आलेल्या LiFE (लाइफस्टाइल फॉर एनवायरनमेंट) मिशनच्या दिशेनं पडणारं एक पाऊल असल्याचंही बोललं जात आहे.
टॅग्स :Mobileमोबाइलconsumerग्राहकministerमंत्रीtechnologyतंत्रज्ञान