लॉकडाऊनमध्ये मुकेश अंबानींनी किती कमावले?; दर तासाची कमाई पाहून थक्क व्हाल

By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 06:45 PM2020-09-29T18:45:03+5:302020-09-29T18:49:30+5:30

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अखेर त्याची प्रेयसी रिया चक्रवर्तीला अटक झाली आहे. दोन दिवसांपासून रियाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू होती. आज तिसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली.

जगातल्या पहिल्या ५ श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश होणारे मुकेश अंबानी हे एकमेव भारतीय आहेत.

३१ ऑगस्ट २०२० पर्यंत १ हजार कोटींहून अधिक संपत्ती असलेल्यांचा समावेश Hurun India Rich list मध्ये करण्यात आला आहे.

Hurun India Rich list 2020 मध्ये ८२८ जणांचा समावेश आहे. यादीत मुकेश अंबानी यांच्यानंतर हिंदुजा ब्रदर्सचा क्रमांक लागतो. त्यांची संपत्ती १,४३,७०० कोटी रुपये इतकी आहे.

एचसीएलचे संस्थापक शिव नाडर १,४१,७०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

Hurun India Rich list मध्ये गौतम अदानी आणि त्यांचं कुटुंब चौथ्या, तर विप्रोचे अजीम प्रेमजी पाचव्या क्रमांकावर आहेत.

IIFL Wealth Hurun India Rich List 2020 च्या आकडेवारीनुसार भारत आणि आशियातली सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींनी मार्चमधील लॉकडाऊननंतर दर तासाला ९० कोटींची कमाई केली.

गेल्या ९ वर्षांत अंबानींची संपत्ती २,७७,७०० कोटी रुपयांवरून ६,५८,४०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. अंबानी Hurun India Rich list मध्ये गेल्या ९ वर्षांपासून अव्वल स्थानी आहेत.

अमेरिकेतील प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेकनं काही दिवसांपूर्वीच रिलायन्स रिटेलमध्ये ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

अंबानींनी नुकतेच २० अब्ज डॉलर उभारून रिलायन्सला कर्जमुक्त केलं. कोरोनामुळे इतर कंपन्या प्रचंड नुकसान सहन करत असताना रिलायन्समध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक झाली आहे.