शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंबानी पहिल्या तर अदानी दुसऱ्या स्थानावर, हे आहेत भारतातील टॉप-१० श्रीमंत उद्योगपती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 4:05 PM

1 / 11
भारतातील सध्याच्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्ये रिलायन्सचे मुकेश अंबानी, अदानी समुहाचे गौतम अदानी, डी-मार्टचे राधाकिशन दमानी, एचसीएलचे शिव नाडर या प्रमुख उद्योगतपतींचा समावेश आहे. भारतातील सध्याचे टॉप-१० श्रीमंत उद्योगपती आणि त्यांच्या संपत्तीविषयी थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.
2 / 11
रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे फोर्ब्सच्या यादीनुसार केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत त्यांनी चीनमधील अलीबाबा कंपनीचे जॅक मा यांना पिछाडीवर टाकले आहे. त्यांच्याकडे एकूण ८४.५ अब्ज डॉलर (सहा हजार २७३.४१ अब्ज रुपये) एवढी संपत्ती आहे. जगातील श्रीमंताच्या यादीत ते दहाव्या क्रमांकावर आहेत
3 / 11
भारतालील सर्वात श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत गौतम अदानी यांनी दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांची एकूण संपत्ती ५०.५ अब्ज डॉलर (३ हजार ७४९.२० अब्ज रुपये) एवढी आहे. जागतिक श्रीमंतांच्या यादीत ते २४ व्या क्रमांकावर आहे.
4 / 11
एचसीएल टेक्नॉलॉजीचे शिव नाडर हे भारतातील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.५ अब्ज डॉलर (१७४४.६८ अब्ज रुपये) एवढी आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीत ते ७१ व्या क्रमांकावर आहेत.
5 / 11
डी-मार्ट या रिटेल स्पेस कंपनीचे प्रमुख राझाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती १६.५ अब्ज डॉलर (१२२४.९८ कोटी रुपये) एवढी आहे. एवढ्या संपत्तीसह ते भारतातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
6 / 11
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये उदय कोटक यांचा पाचवा क्रमांक लागतो. त्यांची एकूण संपत्ती १५.९ अब्ज डॉलर (११८०.४४ अब्ज रुपये) एवढी आहे.
7 / 11
जगातील सर्वात मोठी स्टिल कंपनी असलेल्या आर्सेलर-मित्तलचे प्रमुख लक्ष्मीनिवास मित्तल हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती १४.९ अब्ज डॉलर ( ११०६.२० रुपये) एवढी आहे. गतवर्षी एस्सार स्टीलचे अधिग्रहण करून त्यांनी भारतामध्य मोठी गुंतवणूक केली आहे.
8 / 11
आदित्य बिर्ला समुहाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १२.८ अब्ज डॉलर (९५०.२९ अब्ज रुपये) एवढी आहे.
9 / 11
सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख सायरस पूनावाला यांचे नाव या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती ही १२.७ अब्ज डॉलर (९४२.८७ कोटी रुपये) एवढी आहे.
10 / 11
औषध क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी असलेल्या सन फार्माचे प्रमुख दिलीप संघवी हे फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंतांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती १०.९ अब्ज डॉलर (८०९.२३ अब्ज रुपये) एवढी आहे.
11 / 11
देशातील अव्वल दहा उद्योगपतींच्या यादीत भारती एअरटेलचे प्रमुख सुनील भारती मित्तल आणि त्यांचे कुटुंबीय दहाव्या क्रमांकावर आहे. त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ही १०.५ अब्ज डॉलर (७७९.५४ कोटी रुपये) एवढी आहे.
टॅग्स :businessव्यवसायMukesh Ambaniमुकेश अंबानीAdaniअदानीIndiaभारत