मोबाईल चोरी झालाय?, मग ही ट्रीक्स वापरा अन् तुम्हीच शोध घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 11:10 AM2020-07-07T11:10:56+5:302020-07-07T11:34:29+5:30

डिजिटलच्या युगात स्मार्ट फोन ही गरज बनली असून बहुतांश लोकांना स्मार्टफोन वापरणे अनिवार्य बनले आहे. साहजिकच त्यामुळे मोबाईल चोरीच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे.

सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी मोबाईलची चोरी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे गरिब व सर्वसामान्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसतो, तसेच त्रासालाही सामोरे जावे लागते.

आपला मोबाईल चोरी गेल्यानंतर तो कशारितीने शोधता येईल, यासंदर्भात आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

मोबाईलची चोरी झाल्यानंतर किंवा हरवल्यानंतर IMEI नंबरद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलचा शोध घेऊ शकता. IMEI नंबरच्या सहाय्याने मोबाईल फोनला सहजपणे ट्रेस करण्यात येईल.

त्यासाठी आपल्याला आयएमईआय फोन ट्रॅकर अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे, या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल ट्रॅक करु शकता.

IMEI याचा फुलफॉर्म हा इंटरनॅशनल मोबाईल इक्वीपमेंट आयडेंटीटी असा आहे. हा 15 अंकी नंबर मोबाईलचे आयडेंटिटी सर्टिफिकेट असते.

IMEI या नंबरला कुणीही बदलू शकत नाही. त्यामुळेच, मोबाईल घेतल्यानंतर हा नंबर आपल्या खासगी डायरीत लिहून ठेवला पाहिजे.

मोबाईलची चोरी झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी लागेल. त्यानंतर, तुम्ही स्वत:ही या अॅपद्वारे फोनचे लोकेशन वा फोन कोणाकडे आहे, हे शोधू शकता.