शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

1 जानेवारी 2024 पासून अनेक नियम बदलणार! 31 डिसेंबरपूर्वी करून घ्या ही कामं, अन्यथा होणार मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 4:51 PM

1 / 9
इंग्रजी नव वर्ष अर्थात 1 जानेवारी, 2024 पासून आर्थिक क्षेत्रात काही बदल होणार आहेत. यामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचण्यासाठी या महिन्याच्या अखेरपर्यंत काही कामे नक्की पूर्ण करा. यात डीमॅट आणि म्युच्युअल फंडाचे नॉमिनेशन, आयटीआर 31 डिसेंबरपूर्वी भरणे. तसेच कंपन्यांना बंद पडलेला यूपीआयडी पुन्हा सुरू करणे आणि बँक लॉकरच्या नव्या अॅग्रिमेंटवर स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे.
2 / 9
आयटीआर दाखल न केल्यास लागेल दंड - आर्थिक वर्ष 2022-23 साठी दंडासह आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर, 2023 आहे. आयकर अधिनियम कायद्याच्या कलम 234 एफ नुसार, जी व्यक्ती निश्चित तारखेपूर्वी आपला रिटर्न दाखल करणार नाही, त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. उशिराने आयटीआर फाइल करणाऱ्यांना पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. मात्र ज्या करदात्यांचे एकूण उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना केवळ 1,000 रुपये दंडच भरावा लागेल.
3 / 9
बँक लॉकर काँट्रॅक्टवर स्वाक्षरी आवश्यक - आरबीआयनुसार, सुधारित बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर, 2023 करण्यात आली आहे. जर एखाद्या बँक ग्राहकाला हे शक्य झाले नाही, तर त्यांचे लॉकर फ्रीज करण्यात येईल.
4 / 9
आरबीआयने 31 डिसेंबर, 2023 या तारखेसह बँक लॉकर करारासाठी, टप्प्याटप्प्याने नूतनीकरण प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ज्या खातेदारांनी 31 डिसेंबर, 2022 रोजी अथवा त्यापूर्वी बँक लॉकर करार जमा केला होता, त्यांना एक सुधारित करारावर स्वाक्षरी करून, संबंधित बँकेच्या ब्रँचमध्ये जमा करावा लागेल.
5 / 9
नव्या सीमसाठी केवायसी आवश्यक - 1 जानेवारी, 2024 पासून नवे सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमांतही बदल होत आहेत. दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नवे सीम कार्ड खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना आता केवायसी जमा करावे लागणार आहे.
6 / 9
अर्थात नो-युअर-कस्टमर (KYC) प्रक्रिया सुरू होईल. तसेच, केवळ दूरसंचार कंपन्याच ई-केवायसी करतील. तसेच, नवे मोबाइल कनेक्शन घेण्यासाठी उर्वरित नियम तेच राहतील. त्यात कुठलाही बदल नसेल. 31 डिसेंबरपर्यंत दस्तएवजांच्या माध्यमानेच सीम कार्ड मिळेल.
7 / 9
नॉमिनीची माहिती देणे आवश्यक - सेबीने सर्व डीमॅट खाताधारकांसाठी 1 जानेवारी, 2024 पर्यंत नॉमिनीची माहिती देणे बंधनकारक केले आहे. खातेधारकांनी असे केले नाही, तर त्यांना शेअर्सची खरेदी विक्री करता येणार नाही.
8 / 9
याशिवाय, सेबीने व्यक्तीशः उपस्थित राहून पॅन, नॉमिनेशन, काँटॅक्ट डिटेल्स, बँक खात्याचे विवरण आणि त्यांच्याशी संबंधित फोलिओ नंबर्ससाठी स्वाक्षरीचा नमुना सादर करण्याकरिता 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
9 / 9
निष्क्रिय यूपीआय ​​आयडी बंद होणार - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने पेमेंट अॅप्स (गूगल-पे, पेटीएम, फोन पे) आदींवरून, एक वर्षाहून अधिक काळापासून सक्रिय नसलेले यूपीआय ​​आयडी आणि नंबर्स निष्क्रिय करण्यास सांगण्यात आले आहेत. न्या दिशा-निर्देशांनुसार, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर (टीपीएपी) आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना (पीएसपी) 31 डिसेंबरपर्यंत याचे पालन करावे लागेल.
टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रSEBIसेबी