महिलांसाठी विशेष स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; ₹५०,०००, ₹१,००,०००, ₹१,५०,००० वर किती रिटर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:41 IST2024-12-26T14:29:40+5:302024-12-26T14:41:15+5:30
Women Investment Scheme: महिलांना आपली बचत मुख्यत: अशा ठिकाणी गुंतवायची असते जिथे त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि चांगलं व्याजही मिळतं. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्कीममध्ये त्यांना उत्तम व्याजही मिळतं आणि पैसाही सुरक्षित राहतो.

Women Investment Scheme: महिलांना आपली बचत मुख्यत: अशा ठिकाणी गुंतवायची असते जिथे त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि चांगलं व्याजही मिळतं. अशा परिस्थितीत महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate-MSSC) त्यांच्यासाठी चांगली ठरू शकते. ही एक डिपॉझिट स्कीम आहे, ज्यावर ७.५% दरानं व्याज मिळत आहे. या योजनेत महिला दोन वर्षांसाठी पैसे जमा करू शकतात. जाणून घेऊ ५०,०००, १,००,०००, १,५०,००० आणि २,००,००० रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल.
एमएसएससी कॅल्क्युलेटरनुसार जर तुम्ही या योजनेत २ लाख रुपये गुंतवले तर ७.५% व्याजानुसार दोन वर्षांनंतर तुम्हाला गुंतवलेल्या रकमेवर व्याज म्हणून ३२,०४४ रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण २,३२,०४४ रुपये मिळतील.
जर तुम्ही यात १,००,००० रुपये गुंतवले तर ७.५ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी १,१६,०२२ रुपये मिळतील.
जर तुम्ही या योजनेत ५०,००० रुपये गुंतवले तर तुम्हाला दोन वर्षांत व्याज म्हणून ८०११ रुपये मिळतील आणि अशा प्रकारे मॅच्युरिटीवर एकूण ५८,०११ रुपये मिळतील.
जर तुम्हालाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकांमध्ये खातं उघडू शकता. कोणत्याही वयोगटातील महिला यात गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलीच्या नावानं पालक खातं उघडू शकता. खातं उघडताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रंगीत फोटो इत्यादी केवायसी कागदपत्रांची आवश्यकता असेल.
नियमाप्रमाणे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अंशत: पैसे काढण्याची परवानगी मिळते. अशावेळी तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या ४० टक्क्यांपर्यंत पैसे काढू शकता. म्हणजेच जर तुम्ही २ लाख रुपये जमा केले असतील तर एका वर्षानंतर तुम्ही ८० हजार रुपये काढू शकता.