LIC चा जबरदस्त प्लॅन! केवळ १ रुपयांत मिळतोय १ कोटींचा फायदा; पाहा कसा लाभ घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 12:33 IST2021-12-31T12:14:44+5:302021-12-31T12:33:45+5:30
भारतीय आयुर्विमा महामंडळच्या (LIC) पॉलिसी उत्तम परताव्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या मानल्या जातात. म्हणूनच लोकांचा कल त्यात पैसे गुंतवण्याकडे असतो.

भारतीय आयुर्विमा महामंडळच्या (LIC) पॉलिसी उत्तम परताव्याच्या दृष्टीने अधिक चांगल्या मानल्या जातात. म्हणूनच लोकांचा कल त्यात पैसे गुंतवण्याकडे असतो. आज आम्ही तुम्हाला LIC च्या एका स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवून कामाच्या वेळेत कोट्यधीश होऊ शकाल.
या स्कीममध्ये तुम्ही केवळ एक रुपयाची गुंतवणूक केली तरी तुम्हाला भरपूर नफा मिळेल. तसेच, यामध्ये तुम्ही गुंतवलेली (Investment) रक्कमही पूर्णपणे सुरक्षित असेल.
आम्ही LIC च्या जीवन शिरोमणीबद्दल तुम्हाला सांगत आहोत. LIC जीवन शिरोमणी योजना १९ डिसेंबर २०१७ रोजी जाहीर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत तुम्हाला चार वर्षांत फक्त १ कोटी रुपये मिळतील.
परंतु ही एक नॉन लिंक्ड, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. या योजनेत गंभीर आजारांपासून संरक्षणाचाही समावेश आहे. एलआयसी जीवन शिरोमणी योजना पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला पॉलिसी मुदतीत आर्थिक सहाय्य प्रदान करते.
या योजनेसाठी, पॉलिसीधारकांना वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी किमान वय १८ वर्षे असणे बंधनकारक आहे. ही योजना प्रामुख्यानं एचएनआय़ (High Networth Individuals) साठी तयार करण्यात आलीये.
१४ वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी कमाल वय ५५ वर्षे, १६ वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी ५१ वर्षे, १८ वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी ४८ वर्षे आणि २० वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी ४५ वर्षे असावं. पॉलिसीची मुदत १४ वर्षे, १६ वर्षे, १८ वर्षे आणि २० वर्षे असेल.
पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारक हयात असल्यास, निश्चित मुदतीदरम्यान रक्कम दिली जाते. यासोबतच पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीवर एकरकमी परतावा दिला जातो.
१४ वर्षांच्या पॉलिसीसाठी १० व्या आणि १२ व्या वर्षात ३० टक्के विमा रक्कम, १६ वर्षांच्या पॉलिसीसाठी १२ व्या आणि १४ व्या वर्षी ३५ टक्के, १४ व्या आणि १६ व्या वर्षी १८ टर्म पॉलिसीसाठी ४० टक्के आणि २० वर्षांच्या पॉलिसीसाठी १६ व्या आणि १८ व्या वर्षात विम्याच्या रकमेची ४५ टक्के रक्कम दिली जाते.