शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाखोंची नोकरी सोडली, हाती निराशा; रतन टाटांनी दिला मदतीचा हात, उभी केली १०० कोटींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 9:50 AM

1 / 7
व्यवसाय म्हटला तर यश अपयश हे आलंच. पण मनात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असली तर यश हे मिळतंच. आज आपण अशाच यशस्वी बिझनेस कपलबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी मिळून मोठा उद्योग उभा केला. त्यांनी एकत्र मिळून आज १०० कोटींची कंपनी उभी केलीये.
2 / 7
Tracxn लाँच करण्यापूर्वी, अभिषेक गोयल आणि नेहा सिंग हे दोघेही आपापल्या नोकऱ्यांमध्ये शीर्षस्थानी होते आणि त्यांना लाखो रुपये पगार मिळत होता. आयआयटी मुंबई आणि लेलँड स्टॅनफोर्ड बिझनेस युनिव्हर्सिटीची पदवीधर असलेल्या नेहा सिंग यांना एका मोठ्या कॅपिटल कंपनीत नोकरी मिळाली. मात्र, नोकरीत असतानाच त्यांच्या मनात व्यवसाय करण्याची इच्छा आली आणि अखेर त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
3 / 7
आम्ही तुम्हाला सांगत आहोत देशातील सर्वात यशस्वी डेटा ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मपैकी एक Tracxn चे संस्थापक अभिषेक गोयल आणि त्यांची पत्नी नेहा सिंग यांच्याबद्दल. त्यांची कंपनी इतकी यशस्वी झाली आहे की देशातील आघाडीचे उद्योगपती रतन टाटा यांनीही त्यांना या व्यवसायात आर्थिक मदत केलीये.
4 / 7
ट्रॅक्सन सुरू करण्यासाठी, अभिषेक गोयल आणि नेहा या दोघांनीही जास्त पगाराच्या नोकऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी कंपनी सुरू केली पण ती स्थापन करणं इतकं सोपं नव्हतं. नेहा आणि अभिषेक यांच्या हाती पहिल्या वर्षी निराशा आली कारण कंपनीचा महसूल खूपच कमी किंवा नगण्य होता.
5 / 7
एक वेळ अशी आली की नेहा आणि अभिषेकनं आशा गमावली. पण, त्यांना त्यावेळी देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांची साथ मिळाली. त्यांनी ट्रॅक्सनमध्ये क्षमता पाहिली आणि कंपनीमध्ये गुंतवणूक केली. रतन टाटांनी हातमिळवणी करताच नेहा आणि अभिषेकच्या यांनी आणखी मेहनत केली आणि कंपनीनं नवी उंची गाठली.
6 / 7
केवळ रतन टाटाच नाही तर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल, डेल्हीवेरीचे साहिल बरुआ, मोहनदास पै आणि नंदन नीलेकणी यांनीही कंपनीत गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.
7 / 7
२०२२ मध्ये, Tracxn नं १० मिलियन डॉलर्स पेक्षा जास्त कमाई नोंदवली, जी भारतीय रुपयांमध्ये ८३ कोटींपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे त्यांच्या कंपनीचं मूल्यांकन १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झालं. डीएनएच्या रिपोर्टनुसार, नेहा सिंग आणि अभिषेक गोयल यांची एकूण संपत्ती २६ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी