शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jan Dhan Yojana: बचत खाते जनधन खात्यात रुपांतरीत करायचेय? ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 2:59 PM

1 / 10
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खात्यांचा शुभारंभ करण्यात आला होता. या जनधन खात्यांचे अनेक लाभ मिळवता येतात. तसेच याचा अनेक गोष्टींसाठी उपयोग होतो, असे सांगितले जाते.
2 / 10
जन धन खात्यात उपलब्ध असलेले सर्वोत्तम फायदे सर्वश्रुत आहेत. जन धन खात्यात किमान रक्कम ठेवण्याची कोणतीही अट नाही. ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध आहे. नि: शुल्क जीवन विमा यांसारख्या अनेकविध सुविधा उपलब्ध आहेत.
3 / 10
मात्र, बँकेत सामान्य बचत खात्यांमध्ये अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येत नाही. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचे बचत खाते जन धनमध्ये रुपांतरित करू शकता. (Convert Savings Account Into Jan dhan)
4 / 10
एक सोपी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सामान्य बचत खात्याचे जनधन खात्यात रुपांतर करणे शक्य होते. PMJDY साठी अर्ज करण्यासाठी आपल्याला फक्त एक फॉर्म भरणे आवश्यक आहे.
5 / 10
जनधन योजनेंतर्गत खाते उघडण्यासाठी आपण भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे. तसेच १० वर्षांपेक्षा जास्त वयाचे पण अल्पवयीन मुलेही जनधन खाते उघडण्यास पात्र आहेत.
6 / 10
संबंधित बँकेत जाऊन केव्हायसी कागदपत्रांसह लेखी अर्ज बँकेला द्यावा लागेल. तसेच रुपे कार्ड मिळवण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल. याशिवाय बचत बँक खात्याचे जनधन खात्यात हस्तांतरण करण्यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल.
7 / 10
रुपे डेबिट कार्ड मिळाल्यानंतर तीन ते चार दिवसांत बचत खाते जनधन खात्यात रूपांतरित होऊ शकेल. मात्र, यासाठी काही महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतात.
8 / 10
खातेदाराचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, बँकेच्या शाखेचे नाव, व्यवसाय/रोजगार, अवलंबितांची संख्या, वार्षिक उत्पन्न, नामनिर्देशित, गाव कोड किंवा शहर कोड अशी काही माहिती विहित नमुन्यात भरणे आवश्यक आहे.
9 / 10
याशिवाय, आधार कार्ड व्यतिरिक्त पॅनकार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांसारखे कोणतेही कागदपत्र सादर करावी लागतात.
10 / 10
याशिवाय, आधार कार्ड व्यतिरिक्त पॅनकार्ड, पासपोर्ट, मनरेगा जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांसारखे कोणतेही कागदपत्र सादर करावी लागतात.
टॅग्स :bankबँकprime ministerपंतप्रधानCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय