शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मस्तच! आता घरबसल्या Ration Card मध्ये जोडा नवीन सदस्याचे नाव; पाहा, सोपी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 2:57 PM

1 / 12
रेशन कार्ड (Ration Card) हे अत्यंत महत्त्वाचं असून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ते आवश्यक आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकार आपल्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते.
2 / 12
फक्त Ration Card च्या माध्यमातून गरीब व्यक्तीला रेशन दिले जाते. अनेक ठिकाणी आयडी प्रूफ म्हणून रेशन कार्डचा वापरही केला जातो. रेशन कार्ड प्रत्येकजण तयार करू शकत नाही.
3 / 12
Ration Card हे फक्त एका विशिष्ट उत्पन्नाच्या गटासाठी आहे, ज्याचे प्रमाण राज्यात वेगवेगळे आहे. फक्त स्वस्त किंमतीत धान्य मिळत नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
4 / 12
कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील Ration Card मध्ये नोंदविला जाणे आवश्यक असते. एखादा नवीन सदस्य आपल्या घरात आला असेल, म्हणजेच एखादे बाळ किंवा नवीन सून किंवा अन्य सदस्य, तर आपण त्यांचे नाव रेशन कार्डमध्ये जोडू शकतो.
5 / 12
घरातील नव्या सदस्याचे Ration Card मध्ये नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुलभ आणि सोपी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर आपले नाव, पत्ता यासह काही अन्य माहिती चुकीच्या पद्धतीने लिहिली गेली किंवा काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारता येतील.
6 / 12
Ration Card मध्ये काही बदल करण्यासाठी आपल्याला अन्य कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. अगदी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हे काम करता येऊ शकते.
7 / 12
Ration Card मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला आधार कार्डमध्ये सुधारणा करावी लागेल. जर एखाद्या मुलीने लग्नानंतर आपले आडनाव बदलले असेल तर तिला आधार कार्डमध्ये वडिलांच्या जागी नवऱ्याचे नाव भरावे लागेल आणि नवीन पत्ता अद्यतनित करावा लागेल.
8 / 12
यानंतर नवीन आधारकार्डचा तपशील पतीच्या क्षेत्रात उपस्थित अन्न विभाग अधिकारी यांना द्यावा लागेल. ऑनलाइन पडताळणीनंतरही आपण नवीन सदस्याचे नाव जोडू शकता. यामध्ये तुम्हाला जुन्या Ration Card मधून नाव काढून नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करावा लागेल.
9 / 12
मोबाइल नंबर आपल्या रेशनकार्डशी लिंक केलेला नसेल तर तो नोंदणी करण्यासाठी आपल्याला https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx ला भेट द्यावी लागेल.
10 / 12
येथे आपल्याला आपला नोंदणीकृत मोबाइल नंबर अद्ययावत करण्याचा पर्याय निवडावा लागेल. असे केल्यावर आपणास आधार क्रमांक विचारला जाईल. घराच्या प्रमुखांचा आधारकार्ड नंबर भरावा या ठिकाणी द्यावा लागेल.
11 / 12
ज्या व्यक्तीच्या नावावर Ration Card तयार केले गेले आहे. यानंतर तुम्हाला दुसर्‍या कॉलममध्ये रेशन कार्ड नंबर लिहावा लागेल. तिसर्‍या कॉलममध्ये घराच्या प्रमुखांचे नाव भरा आणि नंतर आपला मोबाइल नंबर भरा. आपण हे करताच आपला नंबर नोंदविला जाईल.
12 / 12
नवीन Ration Card साठी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, अ‍ॅड्रेस प्रूफ, कुटूंबाच्या प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो, वीज / पाण्याचे बिल / टेलिफोन बिल (कोणतेही एक), भारत सरकारने जारी केलेले कोणतेही दस्तऐवज अशी कागदपत्र आवश्यक आहेत.
टॅग्स :businessव्यवसायtechnologyतंत्रज्ञान