शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुड न्यूज! केवळ ४५० रुपयांत BSNL चा ब्रॉडबँड प्लान; ३,३०० जीबी डेटा आणि मोठी वैधता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:22 PM

1 / 15
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार ब्रॉडबँड प्लान आणला आहे.
2 / 15
Airtel आणि Jio ब्रॉडबँड सेक्टरमध्ये कमाल करीत असल्या, तरी BSNL चा हा प्लान या दोन्ही कंपन्यांच्या प्लानपेक्षा वरचढ ठरणारा असल्याचे सांगितले जात आहे. (bsnl new fiber basic broadband plan)
3 / 15
Airtel आणि Jio या कंपन्यांच्या अनलिमिटेड डेटासाठी ग्राहकाला ८०० रुपये मोजावे लागतात. मात्र, BSNL च्या ऑफरमध्ये अर्ध्या किमतीत जास्त डेटा आणि अधिक वैधता मिळत आहे.
4 / 15
प्रत्येक घरात इंटरनेट पोहोचवण्यासाठी BSNL ने धमाकेदार ब्रॉडबँड प्लान आणला असून, Airtel आणि Jio या दोन्ही कंपन्यांची सुट्टी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. (basic broadband plan in just rupees 450)
5 / 15
एका टेलिकॉम वेबसाइटने दिलेल्या अहवालानुसार, BSNL भारत फायबर ब्रॉडबँड अंतर्गत फायबर बेसिक प्लान देत आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे दुसऱ्या टेलिकॉम ऑपरेटर्स पेक्षा खूपच स्वस्त आहे.
6 / 15
केवळ ४४९ रुपये किंमतीत युझर्स इंटरनेटची मजा घेऊ शकतात. BSNL च्या या प्लानमध्ये ९० दिवसांची वैधता असून, अन्य कंपन्या केवळ एका महिन्याची वैधता देतात, असे सांगितले जात आहे.
7 / 15
BSNL च्या या प्लान अंतर्गत ग्राहकाला कनेक्शन घ्यायचे असल्यास कोणतेही इंस्टॉलेशन चार्ज द्यावे लागणार नाही. या सेवा मोफत दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे युझर्संना यात ३० Mbps ची स्पीड मिळणार असू, सुरुवातीचे तीन महिने एकूण ३,३०० जीबी डेटा दिला जाणार आहे.
8 / 15
BSNL च्या या ब्रॉडबँड प्लान सोबत ग्राहकांना आणखी एक फायदा मिळणार आहे. तो म्हणजेच टेलिफोन लाइनचा. या फोनवरून तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता.
9 / 15
BSNL च्या ब्रॉडबँड कनेक्शनची ही ऑफर केवल तीन महिन्यासाठी आहे. याची वैधता संपल्यानंतर ग्राहकांना महिन्याला ५९९ रुपये द्यावे लागतील.
10 / 15
दरम्यान, BSNL ने ग्राहकांसाठी १९७ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे.
11 / 15
BSNL च्या १९७ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व युझर्सना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. यानंतर रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर 80Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येऊ शकते.
12 / 15
याशिवाय, BSNL च्या या प्लानमध्ये रोज १०० SMS मिळू शकते. या प्लानमध्ये युझर्संना Zing Music अॅपचे फ्री अॅक्सेस मिळू शकणार आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला १८० दिवसांची वैधता मिळते.
13 / 15
या नवीन प्लानला लाँच केल्याशिवाय बीएसएनएलने काही आपल्या प्लानला बंद सुद्धा केले आहे. BSNL ने ४९ रुपये, १०९ रुपये, ९९८ रुपये, आणि १०९८ रुपयांचे प्लान बंद केले आहेत. जे ग्राहक या प्लानचा वापर करीत आहेत. ते वैधता संपेपर्यंत याला वापरू शकतात.
14 / 15
BSNL ने या प्रीपेड प्लान्सला बंद करण्यासोबतच याच्या ३६५ रुपयांच्या प्लानची किंमत वाढवली आहे. आता या प्लानसाठी ग्राहकांना ३९७ रुपये द्यावे लागतील.
15 / 15
BSNL च्या या प्लानमध्ये ग्राहकांना ६० दिवसांची वैधता सोबत फ्री कॉलिंग सोबत रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळू शकते.
टॅग्स :BSNLबीएसएनएलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान