Reliance Jio चा ९८ रूपयांचा लोकप्रिय प्लॅन पुन्हा लाँच; पाहा काय आहेत नवे बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 10:35 PM2021-05-31T22:35:35+5:302021-05-31T22:39:36+5:30

Reliance Jio : वर्षभरापूर्वी कंपनीनं बंद केला होता प्लॅन. नव्या बेनिफिट्ससह कंपनीनं प्लॅन केला रिलाँच

रिलायन्स जिओचा (Reliance Jio) चा लोकप्रिय असलेला ९८ रूपयांचा प्लॅन गेल्या वर्षभरापासून बंद होता. परंतु कंपनीनं आता पुन्हा लाँच केला आहे.

कंपनीनं ९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यामध्ये या प्लॅनची वैधता ही २८ दिवसांवरून कमी करत १४ दिवस केली आहे. सध्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह हायस्पीड डेटाचाही लाभ देण्यात येतो.

याशिवाय कंपनी ग्राहकांना JioCinema आणि JioNews सारख्या सेवांचाही लाभ घेता येतो. यापूर्वी कंपनीकडे १२९ रूपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त होता.

परंतु आता कंपनीनं हा प्लॅन पुन्हा लाँच केल्यानं ९८ रूपयांचा प्लॅन हा सर्वात स्वस्त प्लॅन ठरला आहे.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज दीड जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनची १४ दिवसांची वैधता आहे. यासोबत जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

वर्षभरापूर्वी कंपनीनं हा प्लॅन बंद केला होता. त्यानंतर १२९ रूपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन कंपनीकडे उपलब्ध होता.

कंपनीनं हा प्लॅन बंद करण्यापूर्वीच यामध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्समध्येही बदल करण्यात आले होते. त्याची वैधता २८ दिवसांची करण्यात आली होती.

तसंच यात दरररोज २ जीबी हायस्पीड डेटा देण्यात येत होता. तसंच यासोबत मोफत कॉलिंग आणि ३०० एसएमएसही देण्यात आले होते.

या महिन्याच्या सुरूवातीला कंपनीनं जिओ फोन युझर्ससाठी ३९ रूपये आणि ६९ रूपयांचे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले होते. दोन्ही प्लॅन्सची वैधता १४ दिवसांची आहे.

या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येतं. ३९ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज १०० एमबी डेटा आणि ६९ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ५०० एमबी डेटा देण्यात येतो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स जिओनं ग्राहकांना ३०० मिनिटं मोफत कॉलिंगचीही सेवा दिली होती.