शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

झुनझुनवाला यांनी या वर्षात कमावले तब्बल ₹14428 कोटी! जाणून घ्या, कोण-कोणत्या शेअर्सनं भरली तिजोरी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 5:32 PM

1 / 8
दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी या वर्षात शेअर्समधून तब्बल 14,428 कोटी रुपये कमावले आहेत. Trendlyne कडे असलेल्या आकडेवारीनुसार, त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या शेअर्सचे मूल्य या वर्षी 43.53 टक्क्यांनी वाढून 48,108.40 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
2 / 8
हे मूल्य गेल्या वर्षाच्या अखेरीस 33,518 कोटी रुपये एवडे होते. या कालावधीत प्रमुख्याने टायटन कंपनी आणि टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली. टाटा समूहाच्या या दोन कंपन्यांमध्ये झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक आहे.
3 / 8
या वर्षात टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये 44.90 टक्क्यांची वृद्धी नोंदवली गेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, या कंपनीत झुनझुनवाला यांची 5.37 टक्के एवढी भागीदारी आहे, जिचे मूल्य 17,731.90 कोटी रुपये एवढे आहे.
4 / 8
याचप्रमाणे यावर्षात, टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 88.96 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा स्टॉक या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणारा निफ्टी स्टॉक आहे. Trendlyne नुसार, या शेअरमधील झुनझुनवाला यांची गुंतवणूक 3,968.90 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
5 / 8
18 ऑगस्टला लिस्ट झालेली कंपनी Concord Biotech नेही झुनझुनवाला यांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा शेअर गुरुवारी 1,462.15 रुपयांवर ट्रेड करत होता. या शेअरची इश्यू प्राइस 741 रुपये होती. अर्थात 97 टक्क्यांची वृद्धी झाली आहे.
6 / 8
झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील Metro Brands च्या किंमतीत या वर्षात 48 टक्क्यांची तेजी आली आहे. तर, CRISIL चा शेअर 44 टक्क्यांनी वधारला आहे. याच पद्धतीने कॅनरा बँकेच्या शेअर्मध्ये 31 टक्क्यांची तेजी आली आहे. या दरम्यान बीएसई सेंसेक्समध्ये 18 टक्क्यांची तेजी आली आहे.
7 / 8
या शेअरनं दिला निगेटिव्ह परतावा - झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील इतर शेअर्समध्ये फोर्टिस हेल्थकेअर (44%), एनसीसी (84%) आणि इंडियन हॉटेल्स (38%)चा समावेश आहे. झुनझुनवाला यांच्या टॉप 10 शेअर्सपैकी केवळ एक शेअर स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड घसरला आहे. या शेअरने या वर्षात 8.74 टक्क्यांचा निगेटिव्ह परतावा दिला आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारRakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजारMONEYपैसा