शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 09:28 IST

1 / 7
Post Office Schemes: एकीकडे आरबीआयने (RBI) व्याजदरात कपात केल्यानंतर अनेक बँकांनी एफडीवरील (FD) व्याजदरात घट केली आहे, तर दुसरीकडे पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना बचत योजनांवर पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत राहणारे.
2 / 7
अर्थ मंत्रालयानं १ जानेवारीपासून सुरू झालेल्या चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या आणि शेवटच्या तिमाहीसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त १ लाख रुपये जमा करून ४४,९९५ रुपयांचे फिक्स आणि मोठे व्याज मिळवू शकता.
3 / 7
पोस्ट ऑफिसमध्ये १ वर्ष, २ वर्षे, ३ वर्षे आणि ५ वर्षांच्या कालावधीसाठी 'टीडी' (Time Deposit) खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसचे टीडी खाते हे अगदी बँकांच्या एफडी स्कीमप्रमाणेच असते, ज्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर मॅच्युरिटीवर व्याजासह पूर्ण रक्कम परत मिळते.
4 / 7
बँकेच्या एफडीप्रमाणेच टीडीमध्येही ग्राहकांना मॅच्युरिटीवर व्याजाचे फिक्स पैसे मिळतात आणि त्यात कोणताही बदल होत नाही. सध्या पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना १ वर्षाच्या टीडीवर ६.९ टक्के, २ वर्षांच्या टीडीवर ७.० टक्के, ३ वर्षांच्या टीडीवर ७.१ टक्के आणि ५ वर्षांच्या टीडीवर ७.५ टक्के व्याज देत आहे.
5 / 7
जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये ५ वर्षांच्या टीडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील, ज्यामध्ये ४४,९९५ रुपयांच्या फिक्स व्याजाचा समावेश आहे.
6 / 7
विशेष म्हणजे, सध्या देशातील कोणतीही बँक ५ वर्षांच्या एफडी स्कीमवर ७.५ टक्के व्याज देत नाही. पोस्ट ऑफिसच्या टीडी योजनेत सर्व वयोगटातील ग्राहकांना समान व्याज मिळते.
7 / 7
याउलट, बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत ०.५० टक्के जास्त व्याज मिळते. काही बँका तर ८० वर्षांवरील ग्राहकांसाठी आणखी जास्त व्याज दर ऑफर करतात.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूकMONEYपैसा