किमान एक हजार रुपये गुंतवा आणि दर सहा महिन्यांनी लाभ मिळवा, सरकारची नवी योजना...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 06:58 PM2020-07-03T18:58:11+5:302020-07-03T19:20:58+5:30

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला दर सहा महिन्यांनी नफा मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना जाणून घेऊया...

केंद्रातील मोदी सरकारने १ जुलै रोजी एका नव्या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेचे नाव आहे टॅक्सेबल फ्लोटिंग रेट सेव्हिंग्स बाँड. या योजनेअंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला दर सहा महिन्यांनी नफा मिळणार आहे. नेमकी काय आहे ही योजना जाणून घेऊया...

मोदी सरकारने आणलेली ही योजना म्हणजे एक बाँड स्कीम आहे. यामध्ये गुंतवणूकदाराला बाँड खरेदी करावे लागतील. हे बाँड सात वर्षांसाठी असतील. या बाँडवर वर्षातून दोनवेळा १ जानेवारी आणि १ जुलै रोजी व्याज दिले जाईल.

समजा तुम्ही आताच या बाँडमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला १ जानेवारी २०२१ रोजी याचे व्याज मिळेल. या बाँडवरील व्याजदर हा ७.१५ टक्के आहे.

या बाँडच्या रकमेवरील व्याज दर प्रत्येक सहा महिन्यांनंतर नव्याने निश्चित होईल. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर व्याजाचे पैसे गुंतवणूकदाराच्या अकाऊंटमध्ये जमा होतील.

या बाँडमध्ये किमान एक हजार रुपये गुंतवता येतील. तसेच बाँडमध्ये कमाल गुंतवणुकीसाठी कुठलाही नियम निर्धारित केलेला नाही.

कशी करू शकता गुंतवणूक - Marathi News | कशी करू शकता गुंतवणूक | Latest business Photos at Lokmat.com

या योजनेचे बाँड कुठल्याही सरकारी बँकेतून, तसेच आयडीबीआय बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँकेतून खरेदी करता येऊ शकतील. तसेच रोख रकमेच्या माध्यमातून कमाल २० हजार रुपयांचा बाँड खरेदी करता येईल.

त्याशिवाय ड्राफ्ट, चेक आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोडच्या माध्यमातून बाँड खरेदी करता येऊ शकेल. तसेच बाँड केवळ इलेक्ट्रॉनिक रूपातच खरेदी करता येईल.

मात्र महत्त्वाची बाब म्हणज हा टॅक्स सेव्हिंग बाँड नाही आहे. त्यामुळे या बाँडच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्याजाच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर नियमानुसार टॅक्स भरावा लागेल.