बंपर भरती! 'या' कंपन्या भारतात देणार ४० हजारांहून जास्त रोजगार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:29 PM2020-06-29T15:29:11+5:302020-06-29T15:38:35+5:30

या कंपन्या बाजारात भांडवल उपलब्ध करण्यासाठी मोठ्या संख्येने रोजगार (40000 नोकर्‍या) निर्मिती करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.

कोरोना व्हायरसमुळे आर्थिक संकटात सापडलेल्यांना काही कंपन्या दिलासा देण्याच्या तयारीत आहेत. चीनच्या वुहान शहरातून फैलाव झालेल्या प्राणघातक महामारीमुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आला आहे.

पण लॉकडाऊनमध्ये इंटरनेट कंपन्यांच्या कामात तेजी दिसून आली आहे. या कंपन्या बाजारात भांडवल उपलब्ध करण्यासाठी मोठ्या संख्येने रोजगार (40000 नोकर्‍या) निर्मिती करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. यात अनेक कंपन्या एकूण 40 हजार रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. 

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, ऍमेझॉन इंडियाकडून या नोकऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार केला गेला आहे, अर्ज करण्याची किमान उमेदवारानं १२वी पास असावे. याशिवाय इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलुगू आणि कन्नड भाषांचीही जाण असली पाहिजे. 

थर्ड-पार्टी लॉजिस्टिक फर्म ईकॉम एक्स्प्रेसनेही येत्या दोन महिन्यांत 7 हजार लोकांना नोकरी देणार असल्याचं सांगितलं आहे.

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद, सूरत, चंदीगड, इंदूर, पाटणा, लखनऊ, कानपूर, भोपाळ आणि जयपूर येथे या नेमणुका करण्यात येणार आहेत.

अ‍ॅमेझॉन इंडियाने 20 हजार रोजगार देण्याची घोषणा केली आहे. हैदराबाद, पुणे, कोईंबतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगळुरू, इंदूर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांमध्ये या नोकर्‍या दिल्या जातील.

यामध्ये ईमेल, चॅट, सोशल मीडिया व फोनद्वारे ग्राहकांच्या पाठिंब्यासाठी नोक-या देण्यात आल्या आहेत. नोकरीतील त्रुटींच्या पार्श्वभूमीवर बिग बास्केट, ग्रॉफर्स, पेटीएम, भारत पे या कंपन्यांनीही नव्या नोक-यांची घोषणा केली आहे.

देशावर कोरोनाचं मोठं संकट असून, लॉकडाऊनमुळे मोठ्या बास्केट आणि उत्पादकांच्या व्यवसायात चांगली वाढ झाली आहे.

हेच कारण आहे की, बिग बास्केटने दहा हजार रोजगार उपलब्ध करून देणार आहे, तेथे उत्पादकांनी दोन हजार रोजगारांसाठी अर्ज मागवलेले आहेत.

ज्यायोगे मार्केटची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी कामगार संख्या उपलब्ध होईल. याशिवाय पेटीएम मॉलनेही 300 नोक-या देण्याची घोषणा केली आहे.