शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Railways: टीसी तुम्हाला रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत त्रास देऊ शकत नाही; जाणून घ्या रेल्वेचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 11:47 AM

1 / 8
आजच्या महागड्या जगात स्वत:च्या वाहनाने प्रवास करण्यापेक्षा ट्रेनने प्रवास करणे खूप स्वस्त आहे. ते इंधन, तो टोल आणि हॉटेलमध्ये नाष्टा पाणी याच्या खर्चात तुम्ही ट्रेनने तीनचारदा जाऊन येऊन कराल एवढा स्वस्त. रेल्वे प्रवास करताना काही नियम असतात ते पाळावे लागतात, कारण ती सर्वांची म्हणजेच सरकारी मालमत्ता असते.
2 / 8
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे रेल्वेचे तुम्ही तिकीट काढले म्हणजे रेल्वे विकत घेतली असे नाही. तुम्हाला विंडो सीट मिळाली, खालचा बर्थ मिळाला म्हणजे तुम्ही तिथले सर्वस्वी असे होत नाही. याचे काही नियम आहेत. अनेकदा प्रवाशांमध्ये यावरून भांडणे होतात. यामुळे हे नियम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
3 / 8
रेल्वेचे नियम तुम्हाला कोणी सांगत नाही, ना ही तिकीटावर लिहिलेले असतात. यामुळे ते कोणाला माहिती असण्याचा प्रश्न येत नाही. यामुळे जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा माहितगाराने ते नियम असे आहेत, हे त्या त्या प्रसंगाला सांगणे गरजेचे असते. यासाठी टीसीची देखील मदत घेता येते.
4 / 8
ट्रेनचा प्रवास करायचा असेल तर लोक मिडल बर्थ घेण्यास टाळाटाळ करतात. कारण तिथे झोपणे अवघड असते. यामुळे लोकांची पसंती लोअर बर्थ आणि अप्पर बर्थला असते. परंतू अनेकदा प्रवासी मिडल बर्थ उघडतात आणि त्यावर बसतात. असे केल्याने खाली बसलेल्या लोकांना त्याचा त्रास होतो. त्यांना नीट ताठ कण्याने बसता येत नाही. मग भांडणे सुरु होतात.
5 / 8
भारतीय रेल्वेनुसार मिडल बर्थवाला प्रवासी या बर्थवर रात्री १० ते सकाळी ६ वाजेस्तोवरच झोपू शकतो. जर या काळात तुम्हाला लोअर बर्थवरील प्रवाशाने रोखले तर तुम्ही त्याला हा नियम सांगू शकता. किंवा तुम्ही लोअर बर्थला असाल आणि सकाळी सहा ते रात्री १० या काळात मिडल बर्थ कोणी खोलत असेल तर तुम्ही त्याला रोखू शकता.
6 / 8
आता लोअर बर्थ तुमचा असला म्हणून तुम्हीही सकाळी ६ वाजल्यानंतर सताड झोपू शकणार नाही. कारण त्या मिडल बर्थ वाल्याला किंवा अप्पर बर्थवरील प्रवाशाला बसण्यासाठी जागा द्यावी लागेल. दिवसाचे सीटचे नंबर तुमच्या बर्थवर लिहिलेले असतात. म्हणजेच लोअर बर्थवाल्या प्रवाशाला उठून बसावे लागेल. त्याची विंडो सीट असेल.
7 / 8
आणखी एक महत्वाचा नियम म्हणजे टीटीई रेल्वे प्रवासादरम्यान रात्री १० ते सकाळी सहा वाजेस्तोवर उठवू शकत नाही किंवा त्रास देऊ शकत नाही. रेल्वेच्या नियमांनुसार टीटीई सकाळी सहा ते रात्री १० वाजेपर्यंतच तिकीट तपासू शकतो. त्यानंतर नाही.
8 / 8
परंतू हा नियम रात्री १० नंतर प्रवास सुरु करणाऱ्यांसाठी लागू होत नाही. म्हणजे तुम्ही रात्री १० नंतर प्रवास सुरु केला तर टीसीला तिकीट दाखवावे लागते. त्या आधी बसलेल्यांना टीसी तिकीट पाहण्यासाठी विचारू शकत नाही.
टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे