शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सर्वसामान्यांसाठी धावणार वंदे साधारण ट्रेन? स्लीपर कोचसह 'या' सुविधा असतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 12:55 PM

1 / 8
देशातील सर्वसामान्यांसाठी भारत सरकार लवकरच वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर वंदे ऑर्डिनरी ट्रेन आणणार आहे. या ट्रेनचे नाव वंदे साधारण किंवा वंदे अंत्योदय असू शकते.
2 / 8
ही नॉन एसी ट्रेन असली तरी तिचा वेग वंदे भारत सारखा असणार आहे. एक्स्प्रेस गाड्यांचे संचालन वाढवल्यानंतर, भारतीय रेल्वे आता अपग्रेड केलेल्या सेकंड क्लास अनरिझर्व्ह आणि सेकंड क्लास 3 टिअर स्लीपर कोचसह नवीन वंदे साधारण ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहे.
3 / 8
नव्या ट्रेनचे नाव अद्याप ठरलेले नाही, मात्र तिचे नाव वंदे साधरण किंवा वंदे अंत्योदय असण्याची शक्यता आहे. या ट्रेन सर्वसामान्यांच्या चांगल्या प्रवासासाठी बनवल्या जातील, असे संकेत मिळत आहेत.
4 / 8
एका अधिकाऱ्याने मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की, नवीन वंदे साधरण ट्रेनला वंदे भारत ट्रेनप्रमाणे काही सुविधा दिल्या जातील. पण वंदे भारत आणि वंदे साधरण ट्रेनमधला सर्वात मोठा फरक म्हणजे वंदे भारत ट्रेन ही दोन्ही बाजूंनी स्वयंचलित ट्रेन आहे, तर दुसरीकडे वंदे साधारण लोकोद्वारे चालवली जाईल.
5 / 8
समस्या अशी आहे की बहुतेक ट्रेन लोकोमोटिव्हद्वारे चालवल्या जातात, याच्या दोन्ही टोकांना लोकोमोटिव्ह असतील. महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक टोकाला लोकोमोटिव्ह असल्याने, ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी पुश-पुल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
6 / 8
यामुळे टर्मिनटिंग स्टेशनवर लोकोमोटिव्ह रिव्हर्सलची गरज देखील दूर होईल, ज्यामुळे टर्नअराउंड वेळ कमी होईल. एलएचबी ट्रेनमध्ये 2 सेकंड लगेज, गार्ड आणि दिव्यांग-फ्रेंडली कोच, 8 सेकंड क्लास अनरिझर्व्ह कोच आणि 12 सेकंड क्लास 3-टीअर स्लीपर कोच असतील. सर्व कोच एसी नसलेले असतील.
7 / 8
नवीन वंदे साधरण ट्रेनचे लोकोमोटिव्ह चितरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स (CLW) येथे तयार केले जात आहेत आणि ट्रेनचे कोच चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) येथे बनवले जातील. इंटिग्रल कोच फॅक्टरी ही भारतीय रेल्वेची एकमेव कोच फॅक्टरी आहे, जी सध्या वंदे भारत ट्रेनची निर्मिती करत आहे.
8 / 8
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले की, नवीन ट्रेनचा प्रोटोटाइप या वर्षाच्या अखेरीस तयार होण्याची शक्यता आहे, रेल्वे बोर्डाने ऑक्टोबरचे लक्ष्य ठेवले आहे.
टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे