By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:42 IST
1 / 7रत्ने व अलंकार: अमेरिकी भारतीय दागिन्यांची मागणी, स्पर्धात्मकता वाढेल. याचा फायदा छोटवा आणि मध्यम दागिना उत्पादकांना होईल. कच्चे हिरे व रंगीत रत्नांना लाभ मिळेल.2 / 7तयार कपडे: भारतीय कापड उद्योग जादा शुल्कामुळे अडचणीत आला होता. या करारामुळे या उद्योगास नवीन ऊर्जा मिळाली असून, येणाऱ्या काळात निर्यातीत मोठी वाढ होईल.3 / 7वाहन सुटे भाग: शुल्कात कपातीमुळे भारतात उत्पादित वाहन सुटे भाग अमेरिकी बाजारपेठेत स्वस्त होतील. यामुळे जागतिक पुरवठा साखळीत भारताचे स्थान मजबूत होईल.4 / 7रसायने : भारतातून सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायने, रंगद्रव्ये, कृषी रसायने, औषध निर्मितीसाठी लागणारे घटक अमेरिकेला निर्यात होतात. शुल्क कमी झाल्यामुळे त्यांना लाभ होईल.5 / 7फर्निचर : भारतातून लाकडी फर्निचर, हस्तकलेच्या वस्तू, घराच्या सजावटीच्या वस्तू, लोखंडी कपाटे अशा वस्तूंची निर्यात अमेरिकेला होते. कारागिर, निर्यातदारांना याचा लाभ होईल.6 / 7कृषी उत्पादने, मसाले: मसाले, तांदूळ, तेलबिया, फळे आणि भाजीपाला निर्यात होतो. करारामुळे या निर्यातीला चालना मिळून शेत मालास भाव मिळण्यास मदत होणार आहे.7 / 7यंत्रसामग्री: भारतीय यंत्रसामग्री आणि उपकरणांना अमेरिकेत मोठी मागणी आहे. कराराने भारतीय उत्पादकांना जागतिक स्तरावर गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल.