How to use Credit Cards - क्रेडिट कार्ड : म्हटली तर सोय, नाहीतर फास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 08:52 IST
1 / 8How to use Credit Cards : क्रेडिट कार्ड हल्ली अनेकजण सर्रास वापरतात. बँकाही आग्रह करकरुन क्रेडिट कार्ड देतात. मात्र, क्रेडिट कार्ड कसं वापरावं आणि चुकीचं वापरलं, खर्चाच्या रकमा तुंबल्या, कार्डवरुन पैसे वाट्टेल तेव्हा काढले तर सावकारी व्याज आकारले जाते, तेव्हा मात्र पश्चातापाची वेळ येते. 2 / 8क्रेडिट कार्ड वापरुन कॅश कधीही विड्रॉ करू नये. त्यामुळे क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने वापरायला शिकायला पाहिजे. ते जमलं तर आपण इंटरेस्ट फ्री पैसा वापरुही शकतो, रिवॉर्ड मिळतात, पैसे वापरण्याची आणि खर्चाची सोय होते. 3 / 8क्रेडिट कार्ड अनेकजण वापरतात. मात्र, त्याची शिस्त सांभाळत नाहीत. खर्च करताना हातात कार्ड आहे म्हणून वारेमाप खर्च करणे, ४५ दिवस वेळ आहे म्हणून पैसा वापरणे. यातून चुका होतात आणि खर्चासह व्याजाचा डोंगर मोठा होतो. 4 / 8क्रेडिट कार्डचं बिल येताच, खरेदी करावी म्हणजे पुढे ४५ दिवस तो पैसा तुम्हाला वापरायला मिळतो. म्हणजे शक्यतो मोठी खरेदी करणार असाल तर ती एका महिन्याचं बिल भरुन झाल्यावर लगेच करावी, म्हणजे पुढचे ४५ दिवस आपल्या हातात असतात. योग्य वेळी रक्कम किंवा इएमआय केला असेल तर तो भरता येतो.5 / 8तुमची सर्व बिल्स जर तुम्ही क्रेडिट कार्डवर भरणार असाल तर ती मुदतीच्या आत भरा. मात्र, त्यानंतर क्रेडिट कार्डचे जे बिल येते, तेही मुदतीच्या आत भरणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर वाढतो, पैसे वाचतात आणि पतही सुधारते. 6 / 8त्याहून महत्त्वाचं म्हणजे क्रेडिट कार्डचं बिल येतं तेव्हा त्यातून अमूक इतकी रक्कम भरा, असं बिल सांगते, तेवढी भरली तरी कार्ड चालू राहाते. मात्र, जी रक्कम भरली जात नाही, त्यावर मोठा व्याजदर लागतो. 7 / 8यावर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइण्ट्सचा फायदा भविष्यात होतो. त्यामुळे ते जपून ठेवा, ते कसे वाढतात, याकडे लक्ष ठेवा. इएमआय, बिलं क्रेडिट कार्डवर भरायला काहीच हरकत नाही. मात्र, त्याची शिस्त ठेवा, बिल आलं की मुदतीत भरा. ते साचू देऊ नका. 8 / 8तुमच्या नेहमीच्या, माहितीतल्या लोकांकडेच क्रेडिट कार्ड वापरा. म्हणजे त्या कार्डचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी होते. तुमच्या क्रेडिट कार्डच्या वापरावर आणि खर्चावर बारीक लक्ष ठेवा. लिमिटपेक्षा जास्त खर्च करू नका.