अदार पुनावालांना Covishield मालामाल करणार; सीरम इन्स्टिट्यूट किती फायद्यात? अंदाज पहा...

Published: May 14, 2021 11:57 AM2021-05-14T11:57:06+5:302021-05-14T12:11:07+5:30

Serum Institute profit Covishield Vaccine news: एका मुलाखतीमध्ये अदार पुनावाला यांनी म्हटले होते, असे नाहीय की आम्ही कोरोना लसीतून लाभ मिळवत नाही आहोत. मात्र, आम्ही सुपर प्रॉफिट कमवत नाही आहोत, जे पुर्नगुंतवणुकीसाठी आवश्यक आहे

जगातील सर्वात मोठी लस बनविणारी कंपनी सीरम इन्स्टीट्यूट सध्या सातव्या आसमानमध्ये आहे. कोरोना लसीमुळे कंपनीचा भाव वाढला आहे. 2020-21 चे आर्थिक आकडे अद्याप जारी झालेले नसले तरीदेखील 2019-20 मध्ये सीरमचा फायदा सर्वाधिक नोंदविला गेला होता. (Serum Institute making profit on Covishield, how much? )

2019-20 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा हा 2,251 कोटी रुपये तर निव्वळ उत्पन्न हे 5,926 कोटी रुपये झाले होते. कॅपटिलाइनने या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. अशाप्रकारे कंपनीने प्रत्येक रुपयावर कमाईद्वारे सर्वाधिक नफा मिळविला आणि हे मार्जिन 41.3% होते.

कॅपिटलाईननुसार 2019-20 मध्ये 418 कंपन्यांनी 5000 कोटींहून अधिक उत्पन्नाची घोषणा केली होती. या साऱ्यांमध्ये सीरमचे मार्जिन सर्वाधिक होते. यामुळे सीरम ही सर्वाधिक नफा मिळवणारी कंपनी ठरते.

सीरमला 2013-14 मध्ये 1,741.33 कोटी, 2014-15 मध्ये 1,963.89 कोटी, 2015-16 मध्ये 2,179 कोटी, 2016-17 मध्ये 2,057 कोटी, 2017-18 मध्ये 1,912 कोटी, 2018-19 मध्ये 2,252 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. हे आकडे दाखवितात की , कंपनी फायद्यात सतत वाढ करत होती.

कंपनीच्या कोरोना लसीला मोठी मागणी आहे. देशात करोडो लोकांना लस द्यायची आहेच, परंतू परदेशांनाही पुरवायची आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोव्हिशिल्डची मागणी वेगाने वाढली आहे. यामुळे याचा परिणाम कंपनीच्या फायद्यावर जरूर होणार आहे.

सीरमने केंद्र, राज्य आणि खासगी हॉस्पिटलना कोव्हिशिल्ड लस देण्याचे वेगवेगळे दर निश्चित केले आहेत. राज्य सरकारांना 300 रुपये, खासगी ह़स्पिटलना 600 रुपये आणि केंद्राला 150 रुपयांमध्ये ही लस पुरविली जाणार आहे.

एका मुलाखतीमध्ये अदार पुनावाला यांनी म्हटले होते, असे नाहीय की आम्ही कोरोना लसीतून लाभ मिळवत नाही आहोत. मात्र, आम्ही सुपर प्रॉफिट कमवत नाही आहोत, जे पुर्नगुंतवणुकीसाठी आवश्यक आहे. (Adar Poonawalla had said in an interview about pricing the vaccine at Rs 150: "It is not that we're not making profits... but we are not making super profits, which is key to re-investing.")

एका अंदाजानुसार सीरम 300 रुपये प्रति डोसच्या हिशोबाने कोव्हिशिल्डचे 50 कोटी डोस विकत असेल तर कंपनीला 15000 कोटींचे उत्पन्न होणार आहे. हे 2019-20 च्या उत्पन्नापेक्षा तिप्पटीने जास्त आहे.

2020-21 आणि 2021-22 मध्ये कंपनीचे भाग्य चमकण्याचे हे संकेत आहेत. अमेरिकेची कंपनी फायझरचे उत्पन्न 2020-21 मध्ये 203% वाढले होते.

अदार पूनावाला यांनी पुढील सहा महिन्यांत सीरम इंस्टीट्यूटची उत्पादन क्षमता वाढविण्याचे प्लॅनिंग केले आहे. कोव्हिशिल्डचे वर्षाचे उत्पादन 1.5 अब्ज डोसवरून 2.5 अब्ज डोस करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, मागणी पाहता त्यांनी हे उत्पादन ऑक्टोबरपर्यंत 3 अब्ज डोस करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!