तुम्ही आरोग्य विम्याच्या प्लानमध्ये हे 'एक्ट्रा बेनिफिट' घेतले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:44 IST2025-03-27T18:36:51+5:302025-03-27T18:44:30+5:30

Health Insurance Extra Benefits: आरोग्य विमा घेत असताना कोणते अतिरिक्त फायदे असतात, जे तुम्ही घेऊ शकता? आरोग्य विम्यातील रायडर्स कशाला म्हणतात?

हेल्थ इन्शुरन्स घेताना अनेकजण प्लानमध्ये अतिरिक्त फायदे (एक्स्ट्रा बेनिफिट्स) घ्यायला विसरतात. यांनाच रायडर्स असेही म्हटले जाते.

फक्त बेसिक पॉलिसीमध्ये हे लाभ दिले जात नाहीत. पुढीलप्रमाणे रायडर्स घेतले नसल्यास उपचारावेळी मोठा खर्च होऊ शकतो.

'मॅटर्निटी रायडर' डिलिव्हरी, प्री-नेटल (गर्भधारणेदरम्यानची तपासणी), पोस्ट-नेटल (डिलिव्हरीनंतरची काळजी) आणि काही वेळा नवजात बाळाच्या उपचाराचा खर्च कव्हर करतो.

'क्रिटिकल इलनेस रायडर' कव्हरमध्ये जर तुमच्या कुटुंबात हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार यासारख्या गंभीर आजारांची हिस्ट्री असेल, तर हा कव्हर घेणे समजूतदारपणाचे ठरेल.

'हॉस्पिटल कॅश कव्हर' उपचारात दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशनची शक्यता असल्यास उपयोगी ठरतो. कंपनी प्रत्येक दिवसाच्या हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी ठराविक रक्कम देते.

'रुम रेंट वेवर' रायडर घेतल्यास पसंतीच्या कोणत्याही रूममध्ये राहू शकता, त्यासाठी अतिरिक्त शुल्क लागत नाही.

'ओपीडी रायडर'मध्ये डॉक्टरांची फी आणि टेस्टचा खर्च कव्हर केला जातो. तुम्हाला वारंवार डॉक्टरकडे जावे लागत असेल, तर ओपीडी रायडर खूप उपयोगी ठरतो.