Paytm पेमेंट्स बँक ग्राहकांसाठी खूशखबर! आता FD करण्यासाठी मिळणार दोन पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 08:36 PM2021-01-19T20:36:23+5:302021-01-19T20:50:35+5:30

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट (Digital Payment) सुविधा देणारी कंपनी पेटीएम आपल्या पेमेंट बँक (PPBL) ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट (FD) करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देत आहे.

पेटीएम पेमेंट्स बँकेने ग्राहकांना एफडीची सुविधा देण्यासाठी इंड्सइंड बँकेनंतर आता सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेसोबत (Suryoday Small Finance Bank) भागीदारी केली आहे.

आता पीपीबीएल ग्राहकांना एफडी रे्टस आणि इतर अटींवर पेटीएम पेमेंट्स बँकेसोबत फिक्स्ड डिपॉझिट करता येऊ शकते.

पेटीएम पेमेंट्स बँक सध्या इंडसइंड बँकेच्या सहकार्याने आपल्या ग्राहकांना कमीत कमी १०० रुपयांच्या डिपॉझिटसोबत एफडी सुविधा देत आहे.

आता एसएसएफबीबरोबर नव्या भागीदारीमुळे पीपीबीएल मल्टी पार्टनर एफडी सर्व्हिस देणारी देशातील पहिली पेमेंट बँक बनली आहे.यामुळे ग्राहकांना दोन भागीदार बँकांपैकी कोणतीही एक निवडण्याची संधी मिळेल.

पीपीबीएलने म्हटले आहे की, ग्राहक आता एफडीसाठी दोन्ही भागीदार बँकांच्या ऑफरची तुलना करू शकतील. यामुळे त्यांना किमान ठेव, व्याज दर, एफडी कालावधीनुसार चांगले निवडण्याची संधी मिळेल.

आम्ही खातेदारांना एफडीसाठी फ्लेक्सिबिलीटी उपलब्ध करून देण्यासाठी सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेबरोबर भागीदारी केली आहे, असे पीपीबीएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) सतीश गुप्ता म्हणाले.

याचबरोबर, ग्राहक त्यांच्या सोयीसाठी आणि लाभाची तुलना करुन पसंतीची भागीदार बँक निवडू शकतात, असे सतीश गुप्ता यांनी सांगितले. दरम्यान, पीपीबीएल ग्राहकांकडून वेळेपूर्वी एफडी तोडण्यासाठी कोणताही दंड घेत नाही.

तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर बाबू यांनी सांगितले की, एक लहान फायनान्स बँक म्हणून आमचे लक्ष चांगल्या ग्राहकांच्या अनुभवासह नाविन्यपूर्ण प्रोडक्ट्स आणि सोल्यूशन प्रदान करण्यावर आहे.

याचबरोबर, पेटीएम पेमेंट्स बँकेबरोबरची भागीदारी ग्राहकांना अधिक बचत करण्यास सक्षम करेल, असेही सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर बाबू यांनी सांगितले.