सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! Gold च्या दरात घसरण; फटाफट चेक करा आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 11:41 AM2023-07-21T11:41:36+5:302023-07-21T12:00:14+5:30

Gold-Silver : सोन्या-चांदीच्या दरात बदल झाले आहेत.

Gold - Silver : गेल्या काही महिन्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्यात तेजी दिसून आली आणि त्याची किंमत ५९ हजार प्रति १० ग्रॅमची पातळी ओलांडली.

Gold - Silver : कालही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आज सकाळपासून सोन्यात घसरण दिसून येत आहे. एमसीएक्स एक्सचेंजवर शुक्रवारी सोन्याचे भाव लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत.

सोने सकाळी घसरणीने उघडले. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याचा नवीन दर नक्की पहा.

MCX एक्सचेंजवर शुक्रवार, ४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी डिलिव्हरीसाठी सोने ५९५४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले.

गुरुवारी संध्याकाळी ते ५९,५५२ रुपयांवर बंद झाला होता. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी सोने प्रति १० ग्रॅम ५९९३० रुपयांवर उघडले.

चांदीच्या दरात आज शुक्रवारी सकाळी वाढ झाल्याची पाहायला मिळाले. MCX वर बुधवारी सकाळी, ५ सप्टेंबर २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदी ७५४८९ रुपये प्रति किलोवर उघडले.

दुसरीकडे, ५ डिसेंबर २०२३ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीची किंमत प्रति किलो ७६९२४ रुपयांच्या घसरणीसह उघडले.

शुक्रवारी सोन्याच्या जागतिक किमतीत वाढ होताना दिसत आहे. कॉमेक्सवर, सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.०४ टक्के वाढीसह २०१०.७० डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. सोन्याची जागतिक स्पॉट किंमत देखील वाढून १९७०.६६ डॉलर प्रति औंस झाली.

कोमेक्सवरील चांदीच्या जागतिक फ्युचर्स किमतीत शुक्रवारी वाढ होत आहे. शुक्रवारी सकाळी कॉमेक्सवर चांदीचा भाव ०.१५ टक्क्यांनी घसरून ०.०४ डॉलर प्रति औंस होता.

चांदीची जागतिक स्पॉट किंमत देखील २४.८२ डॉलर प्रति औंस वर व्यापार करत आहे.

सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. याआधी काल सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. एमसीएक्स एक्सचेंजमध्ये सकाळपासूनच तेजी पाहायला मिळत होती.