शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 15:33 IST

1 / 9
जर महागाई आणि जागतिक स्थिती अशीच राहिली, तर २०३० पर्यंत १ ग्रॅम सोन्याची किंमत ३०,००० रुपयांपर्यंत जाईल. याचाच अर्थ १० ग्रॅम (एक तोळा) सोन्यासाठी ग्राहकांना ३ लाख रुपये मोजावे लागतील.
2 / 9
रुपया किंवा डॉलर यांसारख्या कागदी चलनाचे मूल्य महागाईमुळे काळानुसार कमी होते. मात्र, सोन्याचे मूल्य टिकून राहतेच, शिवाय त्यात वाढही होते. यामुळेच गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा वाढत आहे.
3 / 9
भारत, रशिया आणि चीन यांसारख्या देशांच्या मध्यवर्ती बँका डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. सरकारी स्तरावर होणाऱ्या या साठेबाजीमुळे खुल्या बाजारात सोन्याची टंचाई निर्माण होत आहे.
4 / 9
जमिनीतून सोने उत्खनन करण्याचा खर्च दरवर्षी वाढत आहे. नवीन खाणींचा शोध लागण्याचे प्रमाण कमी झाले असून, उपलब्ध नैसर्गिक साठा मर्यादित होत चालला आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त, हे गणितात किमती वाढवत आहे.
5 / 9
रशिया-युक्रेन आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्था अस्थिर आहे. जेव्हा जेव्हा युद्धाची टांगती तलवार असते, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे भाव 'रॉकेट' वेगाने वाढतात.
6 / 9
जागतिक व्यापारात अमेरिकन डॉलरचे वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक निर्बंधांच्या भीतीमुळे अनेक देश डॉलरऐवजी सोन्याला राखीव निधी म्हणून पसंती देत आहेत, ज्यामुळे सोन्याची जागतिक मागणी वाढली आहे.
7 / 9
महागाईचा वेग असाच राहिल्यास २०३० पर्यंत रुपयाची क्रयशक्ती कमी होईल. आज ज्या किमतीत आपल्याला सोने मिळतेय, त्यापेक्षा कितीतरी पट अधिक रक्कम भविष्यात मोजावी लागेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
8 / 9
शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये जोखीम असू शकते, मात्र सोन्यातील गुंतवणूक ही पिढ्यानपिढ्या सुरक्षित मानली गेली आहे. 'अडल्या नडल्याला सोने कामा येते' हा विचार अजूनही प्रभावी ठरत आहे.
9 / 9
तज्ज्ञांच्या मते, जर तुमच्या घरात भविष्यात लग्नसराई किंवा मोठी कार्ये असतील, तर आताच सोने खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. २०३० पर्यंत सोने ही केवळ अतिश्रीमंतांची मालमत्ता बनून राहण्याची भीती आहे.
टॅग्स :GoldसोनंInvestmentगुंतवणूकshare marketशेअर बाजारInflationमहागाई