शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात चांदीची १३ हजारांची झेप; तर सोन्यातही मोठी वाढ; आज २४ कॅरेटचा दर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:20 IST

1 / 8
सोमवारी (५ जानेवारी) बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या किमतीत २४०० रुपयांहून अधिक, तर चांदीच्या किमतीत तब्बल १३,५०० रुपयांहून अधिक वाढ नोंदवली गेली.
2 / 8
अमेरिकेने शनिवारी वेनेझुएलावर लष्करी हल्ला करून राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेतले. या 'जियो-पॉलिटिकल' तणावामुळे जागतिक बाजारपेठ हादरली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे ओघ वाढला आहे.
3 / 8
सकाळी सोन्याने १,३८,२०० रुपये प्रति १० ग्रॅमचा उच्चांक गाठला. सध्या सोने आपल्या 'लाईफ टाईम हाय' (१,४०,४६५ रुपये) च्या जवळ पोहोचले असून, मंगळवारपर्यंत हा जुना विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे.
4 / 8
चांदीच्या किमतीत सर्वाधिक अस्थिरता दिसली. बाजार उघडल्यानंतर काही सेकंदातच चांदी १३,५८४ रुपयांच्या वाढीसह २,४९,९०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. लवकरच चांदी २.७५ लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
5 / 8
बाजार विश्लेषकांच्या मते, वेनेझुएलातील अस्थिरता कायम राहिल्यास सोन्याचे दर लवकरच १.५० लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या पार जाऊ शकतात. जागतिक बाजारातही सोन्याने ४,४०० डॉलर प्रति औंसचा स्तर ओलांडला आहे.
6 / 8
केवळ वेनेझुएलाच नाही, तर रशिया-युक्रेन शांतता चर्चेतील अनिश्चितता, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता आणि किरकोळ गुंतवणूकदारांकडून वाढलेली मागणी यांमुळे ही दरवाढ होत आहे.
7 / 8
सामान्यतः डॉलर इंडेक्स वधारला की सोन्याचे भाव कमी होतात. मात्र, सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे डॉलर आणि सोने दोन्ही एकाच वेळी वधारत असल्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळत आहे.
8 / 8
या आठवड्यात अमेरिकेतील मॅन्युफॅक्चरिंग डेटा आणि रोजगाराची आकडेवारी प्रसिद्ध होणार आहे. या आकड्यांवरून अमेरिकेच्या व्याजदराची दिशा ठरेल, ज्याचा थेट परिणाम पुन्हा सोन्याच्या दरांवर होईल.
टॅग्स :GoldसोनंSilverचांदीAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पTrade Tariff Warटॅरिफ युद्ध