Gautam Adani : गौतम अदानींना ९० मिनिटांत २२ हजार कोटींचा झटका, या यादीतूनही गेले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 03:34 PM2023-03-15T15:34:29+5:302023-03-15T15:38:51+5:30

Gautam Adani Latest News : गेल्या काही दिवसापूर्वी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपामुळे अदानी समुहाचा मोठा तोटा झाला.

Gautam Adani Latest News : गेल्या काही दिवसापूर्वी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपामुळे अदानी समुहाचा मोठा तोटा झाला. अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घरसण झाली. यानंतर आता अदानी समुहाच्या शेअरमध्ये वाढ झाली होती, पण आज पुन्हा घसरण झाली.

आज दुसऱ्या दिवशीही घसरण सुरू होती. सध्या अदानी समुहाच्या तीन कंपन्यांचे शेअर लोअर सर्किटवर व्यवहार करत आहेत.यामुळे आता ९० मिनिटांत गौतम अदानींच्या नेटवर्थमध्ये २२ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. यासह गौतम अदानी यांनी जगातील टॉप २५ श्रीमंतीच्या यादीतून स्थान गमावले आहे.

अदानी समुहाच्या तीन कंपन्या लोअर सर्किटमध्ये व्यवहार करत आहेत. यात अदानी पॉवर, अदानी ट्रांसमिशन, अदानी टोटल गॅस या कंपन्यांचा यात समावेश आहे.

एनडीटीव्हीच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. अदानी एन्टरप्राइजेस आणि अदानी पोर्टच्या शेअरमध्ये घसरण झालेली नाही. पण, तेवढ्या गतीने वाढही झालेली नाही.

काल अदानी समुहाच्या सर्व कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अदानी एन्टरप्राइजेसच्या शेअरमध्ये ७ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.

अदानी समुहाच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये दुसऱ्या दिवशीही घसरण झाली.

फोर्ब्स रिअल टाईमच्या अहवालानुसार, सकाळी १०.४५ वाजता गौतम अदानी यांच्या संपत्तीत २.७ अब्ज डॉलर म्हणजेच २२२,६७७,१००,००० रुपयांची घट झाली आहे. गौतम अदानी यांचे प्रत्येक मिनिटाला २,४७,४१,९०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रत्येक सेकंदाला ४,१२,३६,५०० रुपयांचे नुकसान होत आहे.

गौतम अदानी यांचा टॉप २० श्रीमंतीच्या यादीत समावेश होणार असल्याचे बोलले जात होते. तर दुसरीकडे आज अदानी टॉप २५ श्रीमंतीच्या यादीतून बाहेर पडले आहेत.