1 / 7एक काळ होता, जेव्हा गॅस सिलेंडर हवा असेल तर खूपच त्रास सहन करावा लागायचा. रांगेत उभं राहावं लागायचं. पण आता ही प्रक्रिया सोपी झाली आहे. 2 / 7एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी आता रांगेत उभं राहावं लागत नाही. मोबाईलवरून तुम्ही गॅस बूक करू शकता. आता गॅस मागवणे आणखी सोप्पं झालंय, ते म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरून गॅस सिलेंडर बुक करू शकता.3 / 7व्हॉट्सअपवरून काही सेंकदात तुम्ही एलपीजी सिलेंडर बुक करू शकता. ही सुविधा एचपी, भारत गॅस, इंडेन या कंपनीच्या ग्राहकांसाटी उपलब्ध आहे.4 / 7या कंपन्यांनी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी आपापले व्हॉट्सअप नंबर दिले आहेत. इंडेन गॅस बुक करण्यासाठी 7588888824, एचपी गॅस बुक करण्यासाठी 9222201122, तर एलपीजी गॅस बुक करण्यासाठी 1800224344 हा क्रमांक आहे. 5 / 7आता गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला ज्या कंपनीचे गॅस कनेक्शन आहे, त्या नंबरवर Hi असा मेसेज करायचा आहे. लक्षात ठेवा, तुमचा जो मोबाईल नंबर तुमच्या गॅस कनेक्शनसाठी दिलेला आहे, त्याच नंबरवरून हा मेसेज करायचा आहे.6 / 7त्यानंतर तुम्ही भाषा निवडा. तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कस्टमर नंबरही विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मुख्य मेन्यू दिसेल. त्यावर क्लिक करा.7 / 7मेन मेन्यूवर क्लिक केल्यावर रिफिल म्हणजे भरणा असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर बुकिंग झाल्याचा आणि कोणत्या दिवशी गॅस मिळेल याचा मेसेज येईल.