70 रुपयांवरून आपटून 40 पैशांवर आला होता हा शेअर, खरेदीसाठी लोकांची झुंबड; 5 दिवसांपासून लागतेय अप्पर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 05:45 PM2023-04-19T17:45:01+5:302023-04-19T17:55:01+5:30

आज आम्‍ही आपल्याला अशाच एका स्‍टॉक संदर्भात बोलत आहोत. ज्या स्टॉकवर लोक सध्या तुटून पडले आहेत.

शेअर बाजाराची संपूर्ण माहिती घेऊनच शेअर्समध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरते. अनेक वेळा तर एकाच शेअरमध्ये काही लोकांना तोटा होतो, तर काही लोकांना छप्परफाड फायदा होतो. आज आम्‍ही आपल्याला अशाच एका स्‍टॉक संदर्भात बोलत आहोत. ज्या स्टॉकवर लोक सध्या तुटून पडले आहेत.

सध्या हा शेअर विकण्यासाठी कुणीही तयार दिसत नाही. कधी 70 रुपयांवर व्यवहार करणारा हा शेअर आपटून 40 पैशांवरही आला होता. विशेष म्हणजे हा स्टॉक अगदी ९९ टक्क्यांपर्यंत घसरला होता. आता गेल्या 2 आठवड्यांपासून या शेअरच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

गेल्या तब्बल पाच दिवसांपासून या शेअरला अप्पर सर्किट दिसून येत आहे. हा शेअर विकायला कुणीही तयार नाही. येत्या काळात हा मोठा परतावा देऊ शकतो. असा गुंतवणूकदारांचा अंदाज आहे.

गुंतवणूकदरांना दिला बम्पर परतावा - सध्या रॉकेट बनलेला हा शेअर फ्युचर कंझ्युमर लिमिटेड (Future Consumer Ltd) या फ्युचर ग्रुपच्या FMCG कंपनीचा आहे. या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून या शेअरमध्ये सातत्याने अपर सर्किट दिसत आहे. आजही या शेअरने 5.26% ची उसळी घेतली आहे. हा शेअर आता एक रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या पाच दिवसांत हा शेअर 25 टक्क्यांनी वधारला आहे. 3 एप्रिल 2023 रोजी शेअरची किंमत 0.49 पैसे होती. हा या शेअरचा 52 आठवड्यांची नीचांक आहे. तर 21 एप्रिल 2022 रोजी या शेअरने 5.49 रुपयांची पातळी गाठली. हा त्याचा 52 आठवड्यांची उच्चांक आहे.

एका महिन्यापासून सातत्याने तेजी - future consumer ltd च्या शेअरमध्ये गेल्या एक महिन्यापासून सातत्याने तेजी दिसून येत आहे. या शेअरने गेल्या दोन आठवड्यांत 35 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तसेच गेल्या एका महिन्याचा विचार करता, या शेअरने 21 टक्क्यांचा सकारात्मक परतावा दिला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांचा विचार करता या शेअरने निगेटिव्ह परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)