शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' बिझनेसमध्ये फक्त 5000 रुपयांची करा गुंतवणूक, लाखोंची होईल कमाई, सरकारही करेल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 9:33 AM

1 / 9
जर तुम्ही छोटासा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक कमी गुंतवणूकीचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून दर महिन्याला तुम्हाला चांगली कमाई करता येईल.
2 / 9
भारतात मोठ्या प्रमाणात चहा प्यायली जाते. त्यातच कुल्हड चहा (Kulhad making business) फारच प्रसिद्ध आहे. रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळांवर कुल्हड चहाची वारंवार मागणी असल्याचे पाहायला मिळते. अशावेळी तुम्ही कुल्हड चहा तयार करणे आणि विकण्याचा व्यवसाय करू शकता.
3 / 9
सरकार सध्या कुल्हड चहाची मागणी वाढविण्याकडे लक्ष देत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी केंद्रीय रस्ता आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कुल्हडमधून चहा देण्याच्या निर्णयाला प्रोत्साहन देण्यासाठी प्लॅस्टिक आणि कागदी कपांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
4 / 9
गेल्या काही दिवासांपूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले होते की, येणाऱ्या काळात देशातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर कुल्हडमध्येच चहा मिळेल. प्लास्टिक कपला पर्याय म्हणून कुल्हडमध्ये चहा देण्यात येईल. रेल्वे स्थानकावर प्लास्टिक कप पूर्णपणे बंद होणार आहे.
5 / 9
सध्या देशात जवळपास 400 रेल्वे स्टेशन्सवर कुल्हडमधूनच चहा दिला जातो. येत्या काळात देशातील प्रत्येक स्टेशनवर केवळ कुल्हडमधूनच चहाची विक्री केली जाईल, अशी योजना आहे. प्लास्टिक मुक्त भारतमध्ये रेल्वेचे हे योगदान असणार आहे. तसेच, या योजनेमुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही गोयल यांनी म्हटले होते.
6 / 9
मोदी सरकारने कुल्हड चहाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार सशक्तीकरण योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार कुंभारांना विजेवर चालणारे चाक देते. त्यावरून ते मातीची भांडी तयार करू शकतात. त्यानंतर सरकार कुंभारांकडून ते कुल्हड चांगल्या किमतीत खरेदी करतात.
7 / 9
विशेष म्हणजे, हा व्यवसाय फारच कमी गुंतवणूक करून सुरू करता येतो. यासाठी आपल्याला छोट्या जागेसह 5 हजार रुपयांची आवश्यकता आहे. खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांच्या माहितीनुसार, यंदा सरकार 25 हजार इलेक्ट्रिक चाक वितरीत करणार आहे.
8 / 9
कुल्हडमधील चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही ती सुरक्षित असते. चहाच्या कुल्हडची किंमत सुमारे 50 रुपये आहे. तसेच, लस्सी कुल्हारची किंमत दीडशे रुपये आहे, दुधाच्या कुल्हडची किंमत 100 रुपये ते दीडशे रुपये आहे. मागणी वाढल्यास चांगली किंमत मिळण्याचीही शक्यता आहे.
9 / 9
आजच्या काळात शहरांमध्ये कुल्हडच्या चहाची किंमत 15 ते 20 रुपये असते. जर व्यवसाय योग्य पद्धतीने करायचा ठरवल्यास कुल्हडमधून चांगले उत्पन्न मिळू शकते. 1 दिवसात जवळपास 1 हजार रुपयांची बचत करता येऊ शकते.
टॅग्स :businessव्यवसायNitin Gadkariनितीन गडकरीrailwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलMONEYपैसा