शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदी सरकारचे एक पाऊल मागे; BSNL-MTNL चे विलिनीकरण टाळले, आर्थिक कारण दिले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 3:21 PM

1 / 9
टेलिकॉम कंपन्यांतील स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. यातच सरकारी दूरसंचार कंपन्यांनी दिवसेंदिवस पिछेहाट होताना दिसत आहे. कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे BSNL आणि MTNL विलिनीकरण करण्याचा विचार मोदी सरकारकडून केला जात होता.
2 / 9
मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील तोट्यातील कंपन्यांना उर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर संचार निगम लिमिटेड (MTNL) यांचे संभाव्य विलीनीकरण तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
3 / 9
आर्थिक कारणांअभावी दोन्ही दूरसंचार कंपन्यांचे विलीनीकरण (MERGER PROCESS) होणार नसल्याची माहिती केंद्राच्या वतीने संसदेत देण्यात आली आहे. दरम्यान, दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या अन्य पर्यायावर पडद्यामागून वेगवान घडामोडी घडत आहे.
4 / 9
ग्रामीण क्षेत्रात सर्वाधिक विस्तार असलेल्या बीएसएनएला बळकटी देण्यासाठी 4G आधारीत नेटवर्क विस्ताराला गती देण्यासाठी बीएसएनएल देशभरात १.१२ लाख टॉवर उभारणार असल्याची माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
5 / 9
केंद्र सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या रिकव्हरिला ग्रीन सिग्नल दिला आहे. ज्यामध्ये दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण समाविष्ट आहे. मात्र, अधिक कर्जासहित अन्य आर्थिक बाबींमुळे विलीनीकरण सध्या प्रस्तावित नसल्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा अंतर्गत अहवालात म्हटले आहे.
6 / 9
लोकसभेत अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री अश्वीनी वैष्णव यांनी 4G आधारित नेटवर्कचे जाळ विस्तारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे देशभरात एक लाखाहून अधिक टॉवर उभारणीचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. सध्या तत्काळ स्वरुपात सहा हजार आणि त्यानंतर सहा हजार टॉवरच्या ऑर्डर प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
7 / 9
रेल्वेत इंटरनेट कनेक्शन उपलब्धतेच्या मुद्द्यावर देखील केंद्रीय मंत्र्यांनी भाष्य केलं आहे. 4G नेटवर्क क्षमतेमुळे ताशी १०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या रेल्वेत इंटरनेटचे पुरेशे कनेक्शन उपलब्ध होत नाही. त्यासाठी 5G तंत्रज्ञानाची आवश्यकता असल्याचे केंद्रांनी मंत्र्यांनी म्हटले आहे.
8 / 9
दरम्यान, आतापर्यंत बीएसएनएलच्या निर्गुंतवणुकीची कोणतीही योजना नाही, असे केंद्राकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारकडून भवन, जमीन, टॉवर आणि दूरसंचार उपकरणांसह बीएसएनएलच्या स्थावर मालमत्तेची माहिती मागणवण्यात आली आहे.
9 / 9
बीएसएनएलच्या सर्व सर्कलमध्ये ३२६६ इमारती, १३८८ टॉवर आणि सॅटेलाईट, २१०४२ दूरसंचार उपकरणे आणि ६८६ नॉन-टेलिकॉम उपकरणे आहेत. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये BSNL ची एकूण मालमत्ता ५१,६८६.८ कोटी रुपये इतकी झाली. मागील वर्षी ती ५९,१३९.८२ कोटी रुपये होती.
टॅग्स :BSNLबीएसएनएलMTNLएमटीएनएलCentral Governmentकेंद्र सरकार