शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदी सरकारचा दणका! एलन मस्कचे ‘ते’ स्वप्न भंगणार; तुम्हीही स्टारलिंकसाठी नोंदणी केलीय? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 4:26 PM

1 / 9
गेल्या काही कालावधीपासून भारत इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती करताना पाहायला मिळत आहे. इंटरनेट सेवा आणि स्पीडच्या तुलनेत भारत अन्य देशांमध्ये मागे असला, तरी सुविधा वाढवण्यावर असलेला भर आश्वासक असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 9
अलीकडेच एलन मस्क लोकप्रिय टेस्ला इलेक्ट्रिक कार भारतात सादर करणार असल्याबाबत सांगितले जात आहे. यासह एलन मस्क स्टारलिंक या कंपनीच्या माध्यमातून इंटरनेट सेवा देण्यासही इच्छूक आहे. त्यासाठी नोंदणी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
3 / 9
यातच भारतात सॅटेलाइट इंटरनेट पुरवण्याचा परवाना स्टारलिंक इंटरनेट सर्व्हिसेसकडे नाही. त्यामुळे देशातील नागरिकांनी मस्क यांच्या कंपनीच्या सेवांचे सदस्यत्व घेऊ नये, असे आवाहन केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने केले आहे. नागरिकांनी स्टारलिंकच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे सरकारने म्हटले आहे.
4 / 9
स्टारलिंकने उपग्रहाधारित आंतरजाल सेवेच्या आगावू नोंदणी तसेच विक्रीस आरंभ केल्याचे निदर्शनास आले आहे. www.starlink.com या संकेतस्थळावरून देशभरातील उपग्रहाधारित सेवांसाठी नोंदणी करता येते, असे सांगितले जात आहे.
5 / 9
स्टारलिंककडे परवाना नसल्यामुळे नागरिकांनी स्टारलिंकच्या जाहिरातीला बळी पडू नये, तसेच त्यांच्याकडून पुरविण्यात येत असलेल्या सेवेसाठी नोंदणी करू नये, असे आवाहन भारत सरकारने केले आहे.
6 / 9
केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात सॅटेलाइट इंटरनेटसाठी परवाना जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याच्या सेवांचे सबस्क्रिप्शन घेऊ नये, असे आवाहन केले आहे.
7 / 9
दूरसंचार विभागाने (DoT) स्टारलिंकला नियामक (रेग्युलेटरी) फ्रेमवर्क अंतर्गत आवश्यक त्या मंजुरी घेण्यास सांगितले आहे. कंपनीने आधी परवाना घ्यावा आणि नंतर संज्ञापन (कम्युनिकेशन) सेवेच्या व्यवसायात उतरावे, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे.
8 / 9
दूरसंचार विभागाने असेही म्हटले आहे की, कंपनीने परवान्याशिवाय आपल्या सेवांचा प्रचार करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये. कंपनीने नियामक प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे आणि देशातील सेवांसाठी मान्यता न घेता सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी बुकिंग सुरू केले आहे.
9 / 9
भारतातील दुर्गम भागात इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची कंपनीची तयारी आहे. हे इंटरनेट सॅटेलाइटद्वारे काम करेल. त्यामुळे एलन मस्क यांची थेट स्पर्धा मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजशी होणार आहे. तर कोअर ग्रुपमध्ये त्यांची थेट स्पर्धा भारती एअरटेल ग्रुप कंपनी वनवेबशी आहे.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार